Viral News sakal
Trending News

Viral News : भयंकर! हँडल तुटलं अन् 'ती' चार दिवस बाथरुमध्येच अडकली; दरवाजा तोडताच...

बाथरूमच्या दरवाजाचा हँडल तुटल्यामुळे चक्क चार दिवस आतच होती महिला, मग पुढे...

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणाऱ्या असतात. पण एका महिलेसोबत अशी घटना घडली की ज्याचा आपण कधी विचारही करू शकत नाही.

एका महिलेला बाथरुमचं हँडल तुटल्यामुळे चक्क चार दिवस बाथरुममध्ये राहावं लागलं. हो, तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे पण हे खरंय. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर बरचं गाजतयं. (Viral News a woman stuck in bathroom for four days as door handle break )

ही घटना सिंगापूरमधील एका शहरातील आहे. येथील एक महिलेचं नाव यांग असून ती बाथरुममध्ये अंघोळ करायला गेली मात्र अचानक हँडल तुटलं आणि दरवाजा लॉक झाला. तिने खूप प्रयत्न केला मात्र दरवाजा उघडला नाही.

ती खूप ओरडली, किंचाळली मात्र काहीही फायदा झाला नाही. चक्क चार दिवस ती बाथरुममध्ये राहली. चार दिवस पाणी पित तिने स्वत:ला जीवंत ठेवले.

जेव्हा चारही दिवस ही महिला बाथरुममध्ये अडकली तेव्हा तिच्या कुटूंबियांनी तिला संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र या चार दिवसात या महिलेने फोन उचलला नाही तेव्हा कुटूंबातील लोकांना संशय आला आणि ते त्या महिलेच्या घरी पोहचले. मग पुढे पोलिसांना बोलावण्यात आलं आणि महिलेला बाहेर काढण्यात आलं.

महिलेने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तेव्हा कुठे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT