Viral News sakal
Trending News

Viral News : भिकारीच्या खिशातून निघाले चक्क साडे तीन लाख रुपये, पोलिस पाहून चक्रावले

त्याच्याजवळ असलेल्या एवढ्या कॅशने सर्वच थक्क झाले

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही अंगावर काटा आणणारे असतात. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

उत्तर प्रदेशच्या गोरखपुरमध्ये एका भिकारीच्या खिशातून चक्क तीन लाख 64 हजार रुपये निघाले. त्याच्याजवळ असलेल्या एवढ्या कॅशने सर्वच थक्क झाले. (Viral News gorakhpur a begger had three and half lakh rupees in his pocket video goes viral)

उत्तर प्रदेश येथील भटहट बाजार मध्ये एक भिकारी बाइकवर जाणाऱ्या व्यक्तीला धडकतो तर यामुळे भिकारीला गंभीर दुखापत होते. त्यानंतर तेथील लोकल पोलिस त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. पोलिसांनी जेव्हा भिखारीला त्याचं ओळखपत्र दाखवायला सांगितले तेव्हा त्याच्या खिशातून तीन लाख 64 हजार निघाले. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला.

पिपराइच्या स्टेशन अंतर्गत येणारे समदार खुर्दचे निवासी शरीफ बऊंक हे मूक बधिर आहे. पन्नास वर्षाचे असणारे शरीफच्या कुटूंबात कोणीही नाही. ते त्यांच्या पुतण्यासोबत राहतात.

स्थानिक लोकांच्या मते शरीफ हे दररोज भटहट बाजार मध्ये टॅक्सी स्टँडवर सवारीला बस टॅक्सीमध्ये बसवतात. यातुन त्यांना काही पैसे मिळतात तर यासोबच ते भिक सुद्धा मागतात.

या भिकारीजवळ मिळालेल्या कॅशमध्ये 3.64 लाख रुपये होते. भिकारीच्याजवळ इतके कॅश पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या कॅशमध्ये 2000 च्या 168 नोट मिळाले असून ही सर्व कॅश पोलिस ठाण्यात जमा केली आहे. पोलिसांनी हे पैसे त्याच्या पुतण्यासा द्यावे का असे विचारले तेव्हा भिकारीने इशाऱ्यानेच नाही म्हटलंय.

भिकारी शरीफ म्हणाला जेव्हा मी ठीक होणार तेव्हा स्टेशनमधून माझे पैसे घेऊन जाणार. त्याच्या कॅश मध्ये कैश दोन हजारच्या 168 नोट, 500च्या 50 नोटा, 200 च्या 4 नोटा, 100 च्या 14 नोटा, 50च्या 12 नोटा, 20 च्या 4 नोटा आणि 10 च्या 27 नोटा मिळाल्या.

सोशल मीडियावर या भिकारीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे तर नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT