A boy helps his disabled friend wash his face and pushes his wheelchair to class in a viral video, showcasing the beauty of true friendship. esakal
Trending News

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा... व्हीलचेअरवर बसलेल्या दिव्यांग मित्रासाठी मित्राने असं काही केलं की... हृदयाला स्पर्शून जाणारा व्हिडीओ

Sandip Kapde

मैत्री एक अनमोल नात्याची भावना आहे, जी आपल्या जीवनात स्वतःच निर्माण केली जाते. जन्मापासून आपल्याला कुटुंबातील सदस्यांसोबत अनेक नाती मिळतात, पण मैत्री हे एक असं नातं आहे, जे आपण स्वतः निवडतो आणि जोपासतो. हे नाचं रक्ताच्या नात्यापेक्षा देखील जवळचं असतं. असाच एका व्हायरल व्हिडीओतून प्रकटलेली मैत्रीची खास भावना लोकांच्या हृदयात जागा करत आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओत एका दिव्यांग मुलाला व्हीलचेअरवर बसलेला असतो, तर त्याचा एक नॉर्मल मित्र त्याच्या मदतीसाठी पुढे येतो. या व्हिडीओत तो मित्र आपल्या दिव्यांग मित्रासाला मदत करतो.

शाळेच्या गणवेशात असलेला एक विद्यार्थी आपल्या दिव्यांग मित्राचा चेहरा पाण्याने स्वच्छ करतो. व्हीलचेअरचं हँडल धरून त्याला वर्गाकडे घेऊन जातो. ही जवळपास २५ सेकंदांची क्लिप आहे, पण ती आपल्या हृदयाला स्पर्श करणारी आहे. यामुळे अनेक युजर्स इमोशनल होत आहेत.

व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. "त्या मुलांच्या पालकांनी आधीच विजय मिळवला आहे." "खऱ्या दोस्तीचं हेच उदाहरण आहे", असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. या व्हिडीओने मैत्रीचं महत्त्व आणि तिचं मोल लोकांपर्यंत पोहोचवलं आहे.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर @ghss.aykl या युजरने पोस्ट केला आहे. त्याच्या या व्हिडीओला आतापर्यंत ८.६ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत, तर या व्हिडीओला ६७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर २९ हजारांहून अधिक कमेंट्स देखील आल्या आहेत. या व्हिडीओने समाज माध्यमांवर एक सकारात्मक लहर निर्माण केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Bye Poll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नावावर एकमत! पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Sports Bulletin 15th October 2024: ICC हॉल ऑफ फेमध्ये तीन दिग्गजांचा समावेश ते भारत-न्यूझीलंड कसोटीच्या वेळेत बदल

Justice Idol: कायदा आता आंधळा नाही! न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन्..., सरन्यायाधिशांचा मोठा निर्णय

Shyam Manav: श्याम मानव यांच्या ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ सभेत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

Latest Maharashtra News Updates : बीएमसीने 17-18 ऑक्टोबर रोजी मुंबईत 5-10 टक्के पाणीकपात जाहीर केली

SCROLL FOR NEXT