Seema Haider Pakistan Sakal
Trending News

Pakistan Viral Video: "सीमाला सोडा नाहीतर..."; पाकिस्तानातल्या डाकूंची भारताला धमकी; व्हिडीओ व्हायरल

या डाकूंनी हिंदूंना लक्ष्य करण्याचे मनसुबे व्यक्त केले आहेत.

वैष्णवी कारंजकर

पाकिस्तानातून पळून भारतात आलेल्या सीमा हैदर या महिलेवरुन सध्या तिच्या देशात चांगलाच गोंधळ सुरू आहे. लोक तिला गद्दार म्हणू लागले आहेत. तसंच तिला आता डाकूंनीही धमकी द्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी डाकू रानो शारने धमकी दिली आहे की जर सीमाला परत पाठवलं नाही, तर पाकिस्तानातल्या मंदिरांवर हल्ले केले जातील. त्याने सिंधमधल्या रेहरकी दरबारावरही हल्ला करण्याची धमकी दिली आहे. तसंच हिंदूंवर निशाणा साधण्याची धमकीही दिली आहे.

पाकिस्तानी डाकूने व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तो म्हणतो की आमची मागणी आहे. आम्ही टोळी करून राहतो. आमच्याकडची मुलगी पाकिस्तानातून भारतात गेली आहे. दिल्लीत गेली आहे, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. जर आमच्या मुलीला परत पाठवलं नाही, तर जिथं जिथं हिंदू मंदिरं आहेत, त्यावर आम्ही हल्ला करू. इज्जत प्यारी असेल तर तिला परत करा. आम्ही बलोच जमातीचे आहोत. रानो शारचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो शिव्या देतानाही दिसत आहे.

सीमा हैदर ही पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह पळून भारतात आली आहे. तिचं म्हणणं आहे की PUBG ही गेम खेळताना ती सचिन नावाच्या युवकाच्या प्रेमात पडली. सचिन ग्रेटर नोएडामधल्या एका गावामध्ये राहतो. सीमाला पाहण्यासाठी लोक आता लांबून लांबून सचिनच्या घरी येत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानामध्ये लोक त्याच्यावर चांगलेच भडकले आहे. सीमाने सांगितलं की ती गंगा नदीमध्ये स्नान करून हिंदू धर्म स्विकारायला तयार आहे.

पण यावर पाकिस्तानी नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. जी पाकिस्तानची होऊ शकली नाही, ती भारताची काय होणार, असं त्यांचं म्हणणं आहे. पाकिस्तानी लोकांचं म्हणणं आहे की सीमाने त्यांना भारतासमोर मान झुकवायला लावली. तर काही पाकिस्तानी म्हणतात, जर सीमा शुद्ध हिंदी बोलते तर ती पाकिस्तानी कशी काय असेल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

SCROLL FOR NEXT