Viral Video  esakal
Trending News

Viral Video : याच्या टुथपेस्टमध्ये मीठ नाहीतर सिमेंट भरलंय, तरूणाची शक्ती पाहून नेटकरी भारावले

सकाळ डिजिटल टीम

Viral Video :

जगात असे अनेक लोक आहेत जे काहीतरी विचित्र करतात. पण त्यातून त्यांच्या शक्तीची आणि मेहनतीची जाणीव होते. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यांची चर्चा होते ते व्हायरल होतात त्यातले लोक प्रसिद्ध होतात. यातील काही लोक तर आपल्याला आश्चर्यचकितच करतात. असाच एक कष्टकरी कामगार वायरल होत आहे.

साधारणपणे वजन उचलण्यासाठी लोक हाताचा आणि पाठीचा उपयोग करतात. पण एका तरुणांनी भरगच्च भरलेली सिमेंटची पोती उचलण्यासाठी दातांचा वापर केला आहे. हा तरुण दिसायला तर काडीपैलवानच दिसतो. पण त्याच्या शक्तीची जाणीव हा व्हिडिओ पाहताक्षणी येते.

आज-काल पंचविशीच्या वयातच लोकांचे दात पडायला लागले आहेत. पण ह्या तरुणाचे दात मात्र फेविक्विक चिटकवल्यासारखे आहेत की काय असाच प्रश्न पडतो. कारण याने आपल्या दातात पकडून सिमेंटचे पोतं उचलले आहे. आणि दुसरं पोतं पाठीवरी घेतला आहे. त्याच्या या अफाट शक्तीची जाणिव होते.

Instagram वरती @kuvarmajhi याने हा व्हिडिओ शेअर केला आहे ज्या व्हिडिओचे कौतुक आता जगभर होत आहे. व्हिडिओ वरती अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यात असे म्हणत आहेत की टूथपेस्ट मध्ये मीट नाही तर अल्ट्राटेक सिमेंट भरला आहे. की काय तर दुसऱ्या एका युजरने दिला आहे की कामाल आहे या पोराची.

अशा प्रकारचा स्टंट तुम्ही अजिबात ट्राय करू नका कारण यामुळे आपल्या जबड्याला इजा होऊ शकते. त्याने आपले दातही पडू शकतात. तसेच पुढे मानेवर लोड आल्याने आपला अपघातही होऊ शकतो. त्यामुळे असं काहीतरी नक्कीच ट्राय करू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT