Viral video shows Virat Kohli life size statue at New York Times Square 
Trending News

Virat Kohli : टाईम स्क्वेअरवर विराट कोहलीचा पुतळा, काय आहे नेमकं कारण?

सकाळ डिजिटल टीम

टीम इंडियाचा विस्फोटक खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीचे चाहते जगभरात पाहायला मिळतात. टी-२० विश्वचषकात विराट कोहलीची बॅट शांत असली तरी त्याच्या एका व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअर येथे विराटचा भला मोठा पुतळा पाहायला मिळत आहे , ज्याची जगभर चर्चा सुरु आहे.

सध्या सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघ विजय रथाच्या मार्गावर असला तरी संघाला विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल चिंता आहे. या स्पर्धेत विराट कोहलीची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक आहे. त्याने चार डावात केवळ २९ धावा केल्या आहेत.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने २४ चेंडूत २४ धावांची खेळी केली. या स्पर्धेत भारतीय संघाच्या सलामीची जबाबदारी विराट कोहलीवर सोपवण्यात आली आहे पण अनुभवी फलंदाज ही कामगिरी चोख बजावण्यात अपयशी ठरला असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच टाईम्स स्क्वेअर येथे विराटचा भला मोठा पुतळा पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकप्रिय मॅट्रेस ब्रँड ड्युरोफ्लेक्स एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये, कोहलीचा पुतळा टाइम्स स्क्वेअरच्या मध्यभागी बॅट धरून उभा असल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विराटचा हा पुतळा मॅट्रेस कंपनीच्या प्रचार मोहिमेचा भाग आहे ज्याचा विराट कोहली सदिच्छादूत आहे. सध्या जगभरात या पुतळ्याची चर्चा रंगली आहे.

यंदाच्या टी-२० विश्वचषकात विराटने पाच सामन्यांमध्ये 13.20 च्या सरासरीने 66 धावा केल्या आहेत. भारतीय संघाने सुपर८ मधील सर्व सामने जिंकत टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत २४ धावांनी विजय मिळवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: भारताच्या विकासगाथेचा लाभ घ्या, पंतप्रधान मोदींचे अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांना आवाहन!

Sakal Podcast: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर ते ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीत

आजचे राशिभविष्य - 24 सप्टेंबर 2024

Encounter: अजून एक ‘एन्काउंटर’; पोलिस चकमकीत 'या' आरोपीचा झाला मृत्यू

Supreme Court : ‘चाइल्ड पोर्न’ पाहणे गुन्हाच, डाउनलोड करण्यास ‘सर्वोच्च’ मनाई.. मद्रास हायकोर्टाचे आदेश रद्द

SCROLL FOR NEXT