Viral Video esakal
Trending News

Viral Video : युट्यूबवर पैसे कमावण्यासाठी गुलजार रेल्वे रूळांवर ठेवतो दगड, स्टंटबाजीमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका

youtuber gulzar sheikh viral video : युट्यूबवरून पैसे कमावण्यासाठी तो रेल्वे रूळांवर चित्र-विचित्र वस्तू ठेवतो. ज्यामुळे, हजारो लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

Monika Lonkar –Kumbhar

Viral Video : आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काही ही करतात. हजारो लाईक्स आणि व्हिव्जसाठी सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसर कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे अनेकदा आपण पाहतो. सध्या सोशल मीडियावरील एक युट्यूबर त्याच्या खतरनाक व्हायरल व्हिडिओंमुळे मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. त्याच्यावर नेटकऱ्यांनी कारवाईची देखील मागणी केली आहे.

या युट्यूबरचे नाव गुलजार शेख असे आहे. हा युट्यूबर उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी आहे. त्याचे युट्यूबवर स्वत:चे एक चॅनेल असून या चॅनेलच्या माध्यमातून तो लालगोपालगंज रेल्वे स्थानकावरून विचित्र अन् धोकादायक व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

युट्यूबवरून पैसे कमवण्यासाठी तो रेल्वे रूळांवर चित्र-विचित्र वस्तू ठेवतो. ज्यामुळे, हजारो लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. याबाबत 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनेक वापरकर्त्यांनी गुलजारचे हे विचित्र व्हिडिओ शेअर केले असून, भारतीय रेल्वेकडे कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, 'X' या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवर @trainwalebhaiya या युझरने लिहिलयं की, या युट्यूबरवर भारतीय रेल्वेने कारवाई करावी. तसेच, @Tushar15_ या युझरने लिहिलयं की, ही पोस्ट खरी असून, या व्यक्तीचे युट्यूब चॅनेल आहे. जो त्यावरून विचित्र अन् धोकादायक व्हिडिओ शेअर करतो.

त्याच्या या खोडसाळपणासाठी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी कडक कारवाई करावी आणि त्याचे सर्व व्हिडिओ, कंटेंट चॅनेलवरून काढून टाकावेत, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. तसेच, @Manish2497 या युझरने लिहिलयं की, रेल्वे प्रशासन यावर काही कारवाई करेल की नाही, हे आम्हाला माहित नाही. परंतु, तरीही आम्ही तक्रार करत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT