union minister of state savitri thakur viral Video : केंद्रातील मोदी सरकारमधील राज्यमंत्री सावित्री ठाकुर यांना 'बेटी बचाओ बेटी पढाओ' ही घोषणा बोर्डावर लिहीता आली नाही. याचा व्हिडीओ काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी त्यांच्या एक्स सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
या घटनेबद्दल सविस्तर माहिती अशी की, मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात तीन दिवसांचा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी महिला आणि बाल कल्याण विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकुर यांना बोलवण्यात आले होते. कार्यक्रमात शाळकरी मुलांचे स्वागत केल्यानंतर शिक्षा रथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले जाणार होते. त्याआधी रथावर लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर सावित्री छाकूर यांना 'बेटी बचाओ बेटी पढाओ' हे स्लोगन लिहायचे होते. मात्र त्यांनी 'बेढी पडाओ बच्चाव' लिहीलं.
या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधी पक्ष काँग्रेसकडून यावर जोरदार टीका केली जात आहे. नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती या घटनेचा व्हिडीओ शेअर करत आहेत. मंत्री ठाकूर यांनी लिहीलेल्या स्लोगन फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंट करत आहेत.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, धारच्या खासदार आणि केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकुर या १२वी पास आहेत. त्या दुसऱ्यांदा धार लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या आहेत.त्यांच्या कुटुंबाचा राजकारणाशी संबंध नव्हता. पती शेतकरी तर वडील सरकारी कर्मचारी आहेत. सावित्री ठाकूर या संघाशी संबंधित आहेत आणि त्या परिसरात सक्रिय आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.