Julian Assange 
Trending News

Julian Assange: मायावतींच सिक्रेट केलेलं उघड, कोण आहे असांजे ? अमेरिकेने ठेवलेलं तुरुंगात

ज्युलियन असांजे यांच्या सुटकेनंतर भारतामध्ये पुन्हा चर्चा रंगली ती म्हणजे मायावतींवर केलेल्या गंभीर आरोपांची.

सकाळ डिजिटल टीम

हेरगिरीचा आरोप झाल्यानंतर मागील दशकभरापासून अमेरिकेत हस्तांतर होण्याविरोधात लढा देणारे ‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांजे यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली आहे. त्यांच्या सुटकेनंतर भारतामध्ये पुन्हा चर्चा रंगली ती म्हणजे मायावतींवर केलेल्या गंभीर आरोपांची.

असांजे यांनी 2011 मध्ये मायावती यांचे वर्णन हुकूमशहा आणि भ्रष्ट असे केले होते. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी आवडीचे सँडल घेण्यासाठी खासगी विमान मुंबईला पाठवले होते, असा खुलासा केला होता. तसेच, त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना इतकी मोठी आहे की त्यांचे अन्न खाण्यापूर्वी एका कर्मचाऱ्याला त्याची चव चाखते. त्यांच्या स्वयंपाकघरात अन्न तयार करणाऱ्या नऊ स्वयंपाकी त्यांच्या देखरेखीखाली असतात. असं मायावतींच सिक्रेटदेखील असांजे यांनी उघड केलं होतं.

त्यांच्या या आरोपानंतर मायावती यांनीदेखील त्यांना सडेतोड उत्तर दिले होते. मायावतींच सिक्रेट उघड करणारे ‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांजे आहेत तरी कोण जाणून घेऊ.

ज्युलियन असांजे आहेत तरी कोण?

ज्युलियन असांज यांचा जन्म 1971 साली ऑस्ट्रेलियातील टाउन्सव्हिल इथं झाला. त्यांच्या आई-वडिलांची फिरती नाटकमंडळी होती. त्यामुळं त्यांच्या बालपणाचा प्रवास खडतर होता.

असांज यांना कॉम्प्युटरमधील अधिक ज्ञान होते. 1995 साली हॅकिंगमध्ये दोषी आढळल्यानं त्यांना हजारो ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंडही भरावा लागला होता. पुन्हा अशा प्रकारचं कृत्य न करण्याचं मान्य केल्यानं असान्जचा तुरूंगवास टळला होता.

मेलबर्न विद्यापीठामध्ये फिजिक्स आणि मॅथ्स शिकायला जाण्यापूर्वी त्यांनी इंटरनेटसंबंधी पुस्तक लिहायलाही मदत केली होती. 2006 साली असांज यांनी काही लोकांसोबत 'व्हिसल ब्लोइंग' वेबसाइट विकिलीक्सची सुरूवात केली.

विकिलिक्स म्हणजे काय आणि त्यामुळे ज्युलियन असांज इतका अडचणीत का आला?

ज्युलियन असांज यांनी 2006 मध्ये विकिलिक्स सुरू केले, संभाव्य लीकर्ससाठी वेब-आधारित "डेड लेटर ड्रॉप" तयार केले. वेबसाइट एप्रिल 2010 मध्ये चर्चेत आली.

जेव्हा त्यांनी बगदादमध्ये अमेरिकेच्या लष्करी हेलिकॉप्टरनं कशाप्रकारे 18 सामान्य नागरिकांना मारलं याचा एक व्हीडिओ प्रकाशित केला. त्याचवर्षी विकिलीक्सनं अमेरिकन लष्कराची अनेक गोपनीय कागदपत्रं उघड केली.

अफगाणिस्तान युद्धाच्या वेळेस अमेरिकन लष्कराकडून कशा प्रकारे निरपराध नागरिकही मारले गेले होते, हे या कागदपत्रांमधून स्पष्ट होत होतं. इराक युद्धाशी संबंधित कागदपत्रांमधून अमेरिकन लष्कराकडून 66 हजार नागरिकही मारले गेल्याचं उघड झालं. या सर्व घटनेनंतर अमेरिकन सरकारनं सुरक्षेशी संबंधित गोपनीय कागदपत्र उघड केल्याप्रकरणी असांजवर कारवाईचे संकेत दिले.

स्वीडननेही 2010 साली असांज यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट काढलं. असान्जवर लैंगिक शोषणाचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यांना युकेमध्ये अटक करण्यात आलं होत पण काही कालावधीनंतर जामीन मंजूर झाला.

त्यानंतर स्टॉकहोमला व्याख्यान द्यायला गेले असताना असांज यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आणि दुसऱ्या एका महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला. असांज यांनी आपल्यावरील हे दोन्ही आरोप फेटाळून लावले आणि आपल्याविरोधातील हे आंतरराष्ट्रीय कारस्थान असल्याचं म्हटलं.

स्वीडनमधील चौकशी टाळण्यासाठी असांज यांनी 2012 साली इक्वेडोरच्या लंडनमधील दूतावासात आश्रय घेतला. 2017 साली इक्वेडोरमध्ये सत्तापालट झाला. लेनिन मोरेनो यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली.

त्यानंतर असांज याचे इक्वेडोरसोबतचे संबंध बिघडले. इक्वेडोरनं असांजचा राजाश्रय काढून घेतला. गैरवर्तन, आंतराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन आणि हेरगिरीचे आरोप करत असांजचा आश्रय काढून घेतला.

इराक आणि अफगाणिस्तानातील युद्धाबद्दलची माहिती असणाऱ्या विकीलीक्स फाईल्स जगजाहीर केल्याने अनेकांचे आयुष्यं धोक्यात आली, असा दावा अमेरिकेने गेली अनेक वर्षं केला होता. गेली 5 वर्षं ब्रिटीश तुरुंगात घालवलेल्या असान्ज यांनी अमेरिकेत प्रत्यापर्णाचं प्रकरण तुरुंगातूनच लढवलं होतं.

हेरगिरीच्या गुन्ह्याची कबुली देण्याचा अमेरिकेने दिलेला प्रस्ताव असांजे यांनी मान्य केल्यानंतर लंडनमधील तुरुंगातून त्यांना मुक्त करण्यात आले असून, आता ते ब्रिटनच्या बाहेरही गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT