Why do foreign couples get married in Madhya Pradesh India  
Trending News

स्पेनमध्ये झाली भेट,भारतात केलं लग्न; स्वित्झर्लंडचा नवरोबा अन् जर्मनीच्या नवरीने या गुरुजींमुळे घेतले ७ फेरे

सातासमुद्रापार असलेल्या एका जोडप्याने आपली लग्नगाठ भारतात येऊन बांधली आहे.

सकाळ डिजिटल टीम

लग्न हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येक जण त्या दिवसाची वाट पाहत असतो. लग्नाबाबत प्रत्येकाची अनेक स्वप्ने असतात आणि हे स्वप्न प्रत्यक्षात उरवताना आपापल्या रितीरिवाजानुसार लग्न सोहळा पार पाडत असतात. पण गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एका विशेष लग्नाची चर्चा सुरु आहे.

सातासमुद्रापार असलेल्या एका जोडप्याने आपली लग्नगाठ भारतात येऊन बांधली आहे. स्वित्झर्लंडचा वर आणि जर्मनीची वधू या दोघांनी मध्यप्रदेशमध्ये साताजन्माची गाठ बांधली. मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील नक्षत्र गार्डनमध्ये हा विवाह पार पडला. या सोहळ्याला मोठ्या संख्येनं लोकांनी उपस्थित लावली होती. त्यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे या जोडप्यानं भारतात लग्न का केलं?

तर नेमका किस्सा काय?

स्वित्झर्लंड येथील मार्टिन आणि जर्मनीतील उलरिक यांचा विवाह वैदिक सनातन परंपरेने विवाहसोहळा पार पडला. देशातील सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरू डॉ. रघुवीर सिंह गौर हे या लग्नाचे प्रेरणास्थान आहेत.

झुरिच येथे राहणारा 45 वर्षीय मार्टिन हा व्यवसायाने कायदेशीर ऑडिट कंपनीत अधिकारी आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो सोशल साइट्सच्या माध्यमातून गुरु रघुवीर सिंग यांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर तो गुरुजींना भेटण्यासाठी भारतात येऊ लागला.

तर त्यांची पत्नी उलरिक ही जर्मनीतील असून तिचं वय 48 आहे. ती व्यवसायाने नर्स आहे. या दोघांची पहिली भेट स्पेन दौऱ्यादरम्यान झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांशी फोनवरुन संवाद साधू लागले अन् कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी लग्न करायचं होतं.

पण मार्टिनला गुरु रघुवीर सिंग यांची लग्नाला उपस्थिती हवी होती. त्यासाठी तो भारतात आला अन् त्याची इच्छा पुर्ण झाली.

गुरुजींमुळे भारतीय संस्कृतीची आवड वाढली

वधु उलरिकने लग्नानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून मी गुरुजींशी जोडले गेले. मी भारतातील अनेक संस्कृती शिकले. गुरुजींच्या आध्यात्मिक प्रवचनांनी आम्ही दोघं प्रेरित झालो आहोत. . भारतीय संस्कृतीची आवड वाढली. टीव्हीवर हिंदू विवाहसोहळा पाहिला. त्यानंतर आम्ही दोघांनी याच पद्धतीनं लग्न करायचं ठरवल अन् गुरुजींना आमचा विवाह संपन्न केला.

तर वर मार्टिननेदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. , मी स्पेनमध्ये उलरिकला भेटलो. गुरुजींशी माझा पाच वर्षांपासून संबंध आहे. भारतात येऊन त्यांची भेट घेतली. लग्नाच्या वेळी मी तिसऱ्यांदा भारतात आलो आहे.

चर्चमध्ये लग्न करणे मला योग्य वाटले नाही. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुजींचा आशीर्वाद. जेव्हा मी त्यांच्याशी लग्नाबद्दल बोललो तेव्हा त्यांनी मला भारतीय संस्कृतीबद्दल सांगितले, ज्यामुळे मी प्रभावित झालो आणि हिंदू परंपरेनुसार उलरिकाशी लग्न करण्यास तयार झालो. भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी गुरुजींनी मला मेहर बाबांचे पुस्तक दिले.

मार्टिनवर सोळा मूल्यांचा प्रभाव होता

शक्तीपत तज्ञ डॉ. रघुवीर सिंह गौर यांनी सांगितले की, मार्टिन हे स्वतः योगगुरू आहेत. माझ्या ज्ञानामुळं मार्टिन अधिक प्रभावित झाले. त्यानंतर मार्टिनला मी भारतात येण्यास आणि भेटण्यास सांगितलं. ती मुलगीही मला भेटायला आली होती.

इथल्या जीवनशैलिची चर्चा झाली तेव्हा मार्टीनवर सोळा मूल्यांचा प्रभाव होता. हा त्यांचा प्रेमविवाह आहे. त्यांना विवाह सोहळा आवडला कारण त्याची साक्षी अग्नि आहे. त्यांनी मला गुरू म्हणून स्वीकारले असल्याने वैदिक हिंदू परंपरेनुसार त्यांनी माझ्या उपस्थितीत लग्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT