Playing Card Sakal
Trending News

Playing Card : पत्त्यांच्या कॅटमधील एकाच बादशाहने का केली शेव्हिंग? जाणून घ्या, कहाणी

जुगाराचा एक प्रकार म्हणून आणि मौजमजेसाठी खेळल्या जाणार्‍या पत्त्याच्या खेळाबद्दल प्रत्येकाला माहिती आहे.

सकाळ डिजिटल टीम

Why Only One King Of Playing Cards Without Mustache : आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी पत्ते खेळले असतेली किंवा आजही वेळ मिळाला की आपल्यापैकी अनेकजण पत्ते खेळत असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत ती तुम्ही इतकी वर्षे झाली तरी लक्षात आली नसेल.

CARDS

पत्त्यांच्या कॅटमध्ये चार बादशाह असतात हे आपल्याला माहिती आहे. मात्र, लाल रंगाचा म्हणजेच बदामचा बादशाह इतर तीन बादशाहांच्या तुलनेत थोडा वेगळा आहे. या बादशाहाला मिशी नाहीये. आज आम्ही तुम्हाला चार बादशांहापैकी एकालाच का मिशी नाहीये? याबद्दलची कहाणी सांगणार आहोत.

Diwali

जुगाराचा एक प्रकार म्हणून आणि मौजमजेसाठी खेळल्या जाणार्‍या पत्त्याच्या खेळाबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. पोकर, ब्लॅकजॅक, ब्लफ, रम्मी, 3-2-5 आणि फर्स्ट कॅच यांसारख्या पत्त्यांसह अनेक खेळ खेळले जातात.

पत्त्यांमध्ये एकूण 52 कार्ड असतात. एक ते दहापर्यंत सर्वसाधारण पत्ते असतात. ज्यांना अनुक्रमे एक्का, दुक्की, तिर्री, चौकी, पणजी, छक्की, सत्ता, अठ्ठी, नव्वी आणि दश्शी असे पत्ते आहेत. त्यानंतर गुलाम, बेगम आणि बादशाह येतात.

जर, तुम्ही बादशाहाचे चारही पत्ते काळजीपूर्वक पाहिले तर, तुम्हाला लक्षात येईल की, चारपैकी एकच बादशाहा असा आहे की, ज्याला मिशी नाहीये. हे लाल रंगाचा पत्ता आहे. आता प्रश्न पडतो की असे का?

बदाम बादशाहा मिशीशिवाय का?

असे म्हणतात की, हा खेळ सुरू झाला तेव्हा लाल रंगाच्या बादशाहालादेखील मिशी होती. पण एकदा हे पत्ते पुन्हा डिझाईन केल्यावर डिझायनर एका बादशाहाला मिशी बनवायला विसरला. काही वर्षांपूर्वी झालेल्या या एका चुकीमुळे आजपर्यंत आपल्या पत्त्यांमध्ये एका बादशाहाला मिशा नाहियेत.

चूक झाली तर, ती का सुधारली नाही?

बदाम बादशाह हा खरेतर फ्रेंच राजा शार्लेमेन आहे, जो पूर्वी खूप सुंदर आणि आकर्षक होता. या राजाला इतरांपेक्षा वेगळे दाखवण्यासाठी झालेली ही चूक न सुधारता आहे तशीच ठेवण्यात आली.

पत्त्यांचा खेळ जरी चीनमधून 618-907 दरम्यान सुरू झाला, परंतु भारतात पत्ते हजार वर्षांहून अधिक काळपासून खेळले जात आहेत. पूर्वी हा खेळ फक्त राजघराण्यापुरता मर्यादित होता. आता साधारणपणे प्रत्येक घरात पत्ते खेळले जातात. पण फार कमी लोकांना माहित असेल की पत्त्यांवरचे चार बादशाह कोण आहेत?

पत्त्यांवरील चार बादशाह कोण आहेत?

बदामचा बादशाह : या पत्त्यावर रोमन साम्राज्याचा पहिला राजा फ्रान्सचा राजा शार्लेमेन याचे चित्र आहे. पवित्र रोमन साम्राज्य, जर्मनी आणि फ्रान्सच्या रियासत यादीत तो चार्ल्स -1 म्हणून ओळखला जातो. रोमन साम्राज्यानंतर प्रथमच शार्लेमेनने बहुतेक पश्चिम युरोप एकत्र केले. यामुळेच त्यांना युरोपचे जनक देखील म्हटले जाते.

इस्पिकचा बादशाह : या पत्त्यावर प्राचीन काळातील इस्रायलचा राजा डेव्हिडचे चित्र आहे.

किलवरचा बादशाह : मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट याचे चित्र या पानावर बनवण्यात आले आहे. अलेक्झांडर ज्याने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी बिघडलेल्या घोड्यावर नियंत्रण ठेवले, तो प्राचीन काळातील सर्वात प्रसिद्ध राजांपैकी एक बनला. अलेक्झांडरने त्याच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक भूमी जिंकली होती, जी प्राचीन ग्रीक लोकांच्या ओळखीची होती. या कारणास्तव त्याला विश्वविजेता देखील म्हटले जाते. त्याने इराण, सीरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया, फोनिशिया, जुडिया, गाझा, बॅक्ट्रिया आणि भारतातील पंजाबपर्यंतचा प्रदेश जिंकला होता. त्याला पर्शियनमध्ये इस्कंदर-इ-मकदुनी (मॅसिडोनियाचा अलेक्झांडर) आणि हिंदीमध्ये अलेक्झांडर द ग्रेट असे म्हणतात.

चौकटचा बादशाह : या पत्यावर रोमन राजा सीझर ऑगस्टसचा फोटो आहे. रोमन साम्राज्यावर नियंत्रण ठेवणारा तो पहिला रोमन सम्राट असल्याचे म्हटले जाते. ऑगस्टसने रोमन अर्थशास्त्राची रचना केली आणि रोमला त्याच्या काळातील सर्वात मोठे साम्राज्य बनवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT