woman drowns 5 year old boy with blood cancer in ganga river died watch viral video  
Trending News

कॅन्सर बरा करण्यासाठी चिमुकल्याला गंगेत दिली 'पवित्र डुबकी', अंधश्रद्धेने घेतला पोटच्या लेकराचा जीव! ; Video Viral

उत्तराखंडच्या हरिद्वार येथे बुधवारी दुपारी एका पाच वर्षीय मुलीचा गंगा नदीत बुडाल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रोहित कणसे

उत्तराखंडच्या हरिद्वार येथे बुधवारी दुपारी एका पाच वर्षीय मुलीचा गंगा नदीत बुडाल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील एक कुटुंब आपल्या पाच वर्षीय मुलाला घेऊन हरिद्वार येथे हरकी पौडी येथे गंगा स्नानासाठी घेऊन आले होते. दरम्यान हरकी पौडी येथे बुडून या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेचा एक मन हेलावून टाकणारा व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक महिला मुलाला पाण्यात बुडवताना दिसून येत आहे. यावेळी जवळपासचे लोक त्या महिलेच्या भोवती जमा होतात आणि तिला रोखण्याचा प्रयत्न करू लागतात, मात्र महिला त्या सगळ्याना दूर लोटते. त्यानंतर महिला बऱ्याच वेळानंतर बाळाला पाण्यातून बाहेर काढते.

या घटनेबद्दल पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, दिल्लीतील एक कुटुंब पाच वर्षीय मुलाला घेऊन येथे आलं होतं. त्या मुलाला ब्लड कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी हात वर केल्यानंतर कुटुंबिय त्याला आस्थेपोटी गंगास्नानासाठी हरिद्वार घेऊन आले होते. दरम्यान पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत.

या कुटुंबाला दिल्लीतून आपल्या टॅक्सीमध्ये घेऊन आलेल्या ड्रायव्हरने सांगितलं की, जेव्हा ते लोक मुलाला घेऊन टॅक्सीमध्ये बसले होते तेव्हा ते मुलं खूप आजारी होतं आणि हरिद्वार पर्यंत मुलाची प्रकृती खूपच खालावली होती. कुटुंबिय त्या चिमुरड्याच्या आजारपणाबद्दल आणि गंगास्नानाबद्दल बोलत होते असेही टॅक्सी ड्रायव्हरने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : मुंबईवर कोणी हल्ला केला तर मोदी त्यांना पातळातूनही शोधून काढेन, सोडणार नाही - मोदी

SCROLL FOR NEXT