cockroach anxiety news sakal
Trending News

झुरळाला घाबरून महिलेने घरदारच नव्हे तर मोठ्या पगाराची नोकरीही सोडली

Cockroach Fear Phobia एका महिलेनं चांगल्या पगाराची नोकरी सोडली, यामागील कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

सकाळ डिजिटल टीम

झुरळ म्हणजे अगदी किळसवाणा प्रकार! असं बहुतांशी सगळ्यांनाच वाटतं. पण एखाद्या झुरळामुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय असं तुम्ही ऐकलंय का? आता तुम्ही म्हणाल हा कसला प्रश्न आहे. पण एक महिला आपलं आयुष्य गुण्यागोविंदाने जगत होती, तिला मोठ्या पगाराची नोकरी होती.

पण एका छोट्या झुरळाने तिचं सर्व काही उद्ध्वस्त केलं. झुरळामुळे ती महिला इतकी नाराज झाली की तिने घर सोडलंच नाही तर नोकरीचाही राजीनामा दिला. जेव्हा महिलेने सोशल मीडियावर लोकांसमोर तिची वेदना सांगितली तेव्हा काहीजण हसले, तिची चेष्टा केली तर काहींनी तिला तिच्या वेदना समजून घ्यायला मदत केली.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार ही विचित्र घटना चीनमधील आहे. मंगोलियन महिला ग्वांगझू तिथल्याच एकाच कंपनीत तीन वर्षांपासून काम करत होती. यानंतर मोठ्या पगाराच्या अपक्षेने महिलेने कंपनी बदलली आणि चीनच्या दक्षिण भागात शिफ्ट झाली.

पण तिथे तिला वाईट अनुभवांना सामोर जावं लागलं, ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. त्यामुळे तिला घर आणि नोकरी दोन्ही गमवावं लागलं.

उडणारे झुरळ

या महिलेने चिनी नेटवर्किंग साइट जियाहोंगशुवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात म्हटलंय की, गुआंगडोंग प्रांताच्या राजधानीत जाण्यापूर्वी तिने झुरळ पाहिलं नव्हतं. महिलेला आश्चर्य वाटलं आणि तिने सांगितले की तिला मोठं झुरळ उडताना दिसलं.

महिलेने झुरळांचे फोटो शेअर केले आणि झुरळांनी तिचा कसा छळ केला हे सांगितले. तिला झुरळांची इतकी भीती वाटत होती की तिने घर सोडलं, त्या भागात काम करण्यासही ती टाळाटाळ करत आहे. घरातील भेगा भरूनही फायदा झाला नाही, असं त्या महिलेने सांगितलं. त्या घरात झुरळांची फौजच्या फौज होती.

झुरळ फोबिया

आता या महिलेला झुरळ या शब्दाचीही भीती वाटू लागली आहे. तिच्यावर विश्वास ठेवला तर ती झुरळाची इमोजी पाहूनही घाबरते. तिला झुरळ फोबिया झाला आहे. महिलेने सांगितले की तिला खूप असहाय्य वाटू लागले होते, ती घरी एकटीच रडायची. तिच्या मते, ती कोणत्याही समस्येवर मात करू शकते, परंतु तिच्या मनात असलेली झुरळांची भीती ती नाहीशी करू शकत नाही.

आणि राजीनामा दिला

उडत्या झुरळांचा या महिलेला इतका त्रास झाला की, कंटाळून तिने नोकरीचा राजीनामा दिला. ती महिला म्हणाली, 'आता मला या भागात राहायचे नाही. कारण, मी ऐकले आहे की घरात एक झुरळ भेटला म्हणजे त्याची संपूर्ण फौज खोलीत हजर असते. एका महिलेची ही विचित्र गोष्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT