World Biryani Day : रविवार म्हटलं की अनेकांच्या घरी नॉनव्हेजचा बेत हा असतोच. संधीचं सोनं करायला आज वर्ल्ड बिर्याणी डे सुद्धा आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या रविवारी बिर्याणी डे साजरा केला जातो. तेव्हा यानिमित्ताने तुमच्या घरच्यांना अशी सुगंधित, टेस्टी अन् तोंडाला पाणी सोडणारी बिर्याणी खाऊ घाला. चला तर जाणून घेऊया चिकन बिर्याणी रेसिपी.
चिकन बिर्याणीसाठी लागणारे साहित्य
चिकन
बिर्याणी चा तांदूळ ( बासमती असेल तर उत्तम)
७ ते ८ मिरच्या
दालचिनी
वेलदोडे
शाहि जिरे
दही
मीठ चवीनुसार
हळद
लाल तिखट चमचे
कांदे पातळ चिरून तळून घेतलेलं
आलं लसूण पेस्ट
पुदिना
दुधात भिजवलेली ७ ते ८ काड्या केसर
भिजवलेली कणिक (Biryani Day)
कृती
तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजायला ठेवा
मोठ्या भांड्यात २ ते३ वेलदोडे आणि १ ते २ मिरच्या आणि थोडेसे जास्त मीठ टाकून पाणी उकळायला ठेवा.
एका भांड्यात चिकन, मीठ , हळद, लाल तिखट, ३ ते ४ मिरच्या , दही, शाही जिरे २ चमचे, आलं लसूण पेस्ट, दालचिनी, ४ ते ५ वेलदोडे आणि २ ते ३ चमचे कांदा तळण्यासाठी वापरलेलं तेल, वाटीभर पुदिना, १ वाटी तळलेला कांदा टाकून मिक्स करुन घ्या.
आता ज्या भांड्यात बिर्याणी बनवायची त्यात ते मिश्रण टाकून अर्धवट शिजवून घ्या, उकळत्या पाण्यात तांदूळ टाकून अर्धवट शिजवून घ्या.
अर्धवट शिजवलेलं भातातून पाणी काढून टाका आणि हा भात चिकन वर पसरवून घ्या.
आता भातावर केसर, तळलेला कांदा, कांदा तळलेलं तेल २ चमचे,केसर दूध, थोडासा पुदिना टाका. अगदी अर्धी वाटी म्हणजे बिर्याणी पूर्ण शिजायला लागेल इतपत पाणी टाकून घ्या.
कणिक लावून त्यावर झाकण ठेवून भांडे सील करा आणि अर्धा तास मंद आचेवर गॅस वर शिजवून घ्या. आणि १५ ते २० मि नंतर काढून सर्व्ह करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.