Sharad Pawar Video Sakal
Trending News

"राजकारणात संधी, खुर्ची मिळत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते"; शरद पवारांचा 'तो' जुना Video Viral

दत्ता लवांडे

मुंबई : "राजकारणात संधी मिळत नसते ती तुम्हाला हिसकावून घ्यावी लागते. नाहीतर आमच्यासारखे माणसं उठत नसतात" असं वक्तव्य शरद पवार यांनी एका भाषणात केलं होतं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एका कार्यक्रमात तरूण कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करत होते. त्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले होते की, "मी तुम्हाला सत्य सांगतो, राजकारणात संधी येत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते. तरूण मुलांनासुद्धा संधी मिळत नसते. तुम्हाला लक्ष ठेवून ती खुर्ची आपल्याकडे खेचून घ्यावी लागते. नाहीतर आम्ही उठत नसतो, त्याच तयारीने तुम्ही राहणे अत्यंत गरजेचे आहे असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो" असं पवार म्हणाले होते.

दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये मोठं बंड केलं आणि आपल्यासोबत जवळपास ३५ आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले आहेत. बंडानंतर त्यांनी आपल्यासोबत असलेल्या आमदारांची आणि नेत्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांवर टीका केली होती.

या बैठकीत बोलताना अजित पवार म्हणाले की, "तुम्ही किती दिवस त्या पदाला धरून राहणार, आम्हाला पण संधी द्यायला पाहिजे. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिलाच कशाला, तुमचं वय झालं आता तुम्ही थांबायला पाहिजे, इतरांना संधी द्यायला पाहिजे" असं अजित पवार कार्यकर्त्यांना बोलताना म्हणाले होते. त्यानंतर आता शरद पवार यांचा राजकारणातील आणि सत्तेतील खुर्चीबद्दलचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmi Barve: 'जातवैधता' बाबत रश्मी बर्वेंना 'सर्वोच्च' दिलासा, पडताळणी समितीला दंड! राज्य सरकारवर न्यायालयाचे ताशेरे

Latest Maharashtra News Updates : नागपूर शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस; वर्ध्यासह पश्चिम विदर्भात 'यलो अलर्ट'

शस्त्र परवाना देण्यावर पोलिसांचे निर्बंध! सोलापूर जिल्ह्यातील 4594 जणांकडे वैयक्तिक शस्त्र परवाने; अकलूजमध्ये सर्वाधिक, कोणत्या तालुक्यात किती जणांकडे बंदुका, वाचा...

गुणवत्तेअभावी घटतोय झेडपी शाळांचा पट! शाळांच्या भेटीसाठी नाहीत केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी; 136 केंद्रप्रमुख, 10 गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त, विषय शिक्षकही कमी

Ajit Pawar : 'त्या' आमदाराचं राष्ट्रवादीनं केलं निलंबन; जाणून घ्या काय आहे प्रकरण..

SCROLL FOR NEXT