budget 2022 smartphone wearable charger camera lens and more prices get cheaper  
Union Budget Updates

यंदा स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होतील का? इथे जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर केला आहे. देशाच्या अर्थसंकल्पातील (Budget 2022) तरतूदींचा देशातील सामान्य जनतेच्या खिशावर परिणाम होत असतो, या अर्थसंकल्पानंतर अनेक वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. त्यातील काही मोबाइल फोनमध्ये वापरल्या जातात, त्यानंतर मोबाइल फोनच्या किमती देखील कमी-जास्त होऊ शकतात. यंदाच्या सरकारच्या अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्यावर भर देण्यात आला आहे. 

मोबाईल फोन आणि इतर वस्तूंवर सूट

अर्थसंकल्पात मोबाइल फोन चार्जर, मोबाइल फोन कॅमेरा लेन्स, ट्रान्सफॉर्मरसह अनेक वस्तूंच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी सूट जाहीर केली आहे. या वस्तूंवर कर सवलतीची बाब 2022 च्या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आली आहे . यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल. म्हणजेच मोबाईल फोन आणि मोबाईल फोन चार्जर या बजेटनंतर स्वस्त होणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे.

आलीकडच्या काळात देशात इलेक्‍ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग झपाट्याने वाढले आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, वेअरेबल उपकरणे, ऑडिओ उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स स्मार्ट मीटरच्या घरगुती उत्पादनांना सुट देण्यासाठी ग्रेडेड रेट स्ट्रक्चर उपलब्ध करुन देण्यासाठी कस्टम ड्युटी दरांमध्ये अंशतः सुधारणा केली जात आहे.

या अर्थसंकल्पात मोबाईल फोनशिवाय 5G सेवेबाबतही सरकारने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, 5G स्पेक्ट्रमचा लिलाव 2022 मध्येच केला जाईल, जेणेकरून 2022-23 मध्येच 5G सेवा सुरू करता येईल. यामुळे नवीन नोकऱ्याही मिळतील. दरम्यान Airtel आणि Jio ने आधीच 5G ची ट्रायल रन केली आहे. लवकरच देशात 5G सेवा सुरू होऊ शकते. तसेच, गेल्या एक वर्षापासून देशात जवळपास सर्व कंपन्या 5G स्मार्टफोन लॉन्च करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT