Budget 2023 sakal
Union Budget Updates

Budget 2023 : बाकी सगळं ठीक पण अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना कुठे फटका बसलाय, जाणून घ्या

या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांना कोणता फायदा झालाय अन् कोणता फटका बसलाय, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक तरतुदी आणि योजनांची घोषणा केली. सर्व देशांमध्ये भारताचा विकास दर अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं. सोबतच अर्थसंकल्पात सर्वांना सामावून घेतलयं, असं सुद्धा त्या म्हणाल्या पण खरंच या अर्थसंकल्पात सर्वांना सामावून घेतलंय.

या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांना कोणता फायदा झालाय अन् कोणता फटका बसलाय, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Budget 2023 nirmala sitharaman shares scheme and invesment for the middle class)

सर्वसामान्यांना कोणते फायदे ?

  • पीएम अन्नपुर्णा योजनेद्वारे गरीबांना एक वर्ष मोफत राशन मिळणार तर ८० कोटी लोकांना याचा फायदा होणार. याअन्न योजनेसाठी दोन लाख कोटींचा खर्च करण्यात आलाय.

  • कृषि लोन २० लाख कोटींपर्यंत वाढवण्यात आलंय.

  • मच्छिमारांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली असून ६ हजार कोटींच्या फंडची तरतुद दिली जाणार आहे.

  • ४४ कोटी ६० लाख नागरीकांना जीवन विमा मिळणार आहे.

  • ११.७ कोटी कुटूंबासाठी शौचालय उभारले जाणार आहे.

  • फलोत्पादनांसाठी २२०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

  • शेतकऱ्यांच्या कर्जामध्ये सुट सुरू राहणार

  • टॅक्स रिटर्न भरण आता सोपी होणार

  • व्यव्हारात आता पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता

  • पीएम आवाज योजनेत खर्च ७९ हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे.

  • ४७ लाख युवकांना ३ वर्षापर्यंत भत्ता देणार

  • ज्येष्ठ नागरीकांसाठी मुदत ठेव योजना, १५ लाखांहून ३० लाखांपर्यंत क्षमता वाढवली आहे.

  • कस्टम ड्युटीमध्ये कपात करण्यात आली असून कस्टम ड्युटी ही २१ हून १३ टक्क्यांवर आणली आहे.

  • इलेक्ट्रोनिक गाड्या, खेळणी, सायकल , मोबाईल फोन, एलएडी टिव्ही, कॅमेरा लेन्स स्वस्त होणार

  • ७५ लाख कमावणाऱ्या व्यावसायिकांना टॅक्समध्ये सूट दिली आहे

  • ७ लाखापर्यंत उत्पन्ना असणाऱ्यांना आता कर भरावा लागणार नाही.

सर्वसामान्यांना कुठे फटका बसलाय?

  • हेल्थ विमासाठी कोणतीही तरतुद नाही.

  • अन्नधान्य, भाजीपाला स्वस्त करण्यात आलेला नाही.

  • तरुणांसाठी कोणतीही मेगाभरतीची घोषणा करण्यात आलेली नाही.

  • स्टार्टअप करणाऱ्या बिझिनेस तरुणांसाठी कोणती मोठी घोषणा नाही.

  • इलेक्ट्रीक वाहनांवर सब्सिडी दिली नाही.

  • महिला सक्षमीकरणासाठी कोणतीही खास योजना नाही.

  • स्पोर्ट्ससाठी कोणतीही मोठी तरतुद नाही.

  • मोठ्या व्यापारांसाठी कोणत्याची निधीची तरतूद नाही.

  • होम लोन विषयी कोणतीही मोठी तरतुद नाही.

  • पेंशन योजनेसंदर्भातही अर्थसंकल्पात कोणतीही तरतुद नव्हती.

  • कामगार योजनेतही कोणताही निधी देण्यात आलेला नाही.

  • याशिवाय कला क्षेत्रात कोणतीही तरतुद करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Tanker Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारजे पुलाजवळ गॅस टँकर पलटी; मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

IND vs AUS 1st Test : 8 Runs, 3 Wickets! यशस्वी जैस्वालच्या विकेटनंतर भारताचा डाव गडगडला; ऋषभ पंत, ध्रुव जुरेल ठरले अपयशी

Nashik Assembly Election 2024 Result : नाशिकमध्ये महिला आमदारांची पुनरावृत्ती; जिल्ह्यात 196 उमेदवारांपैकी 20 महिला

Assembly Elections 2024 : पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांची बाजी

Kolhapur North Results : सतेज पाटलांचा बालेकिल्ला ढासळला; राजेश लाटकरांना अपेक्षित मताधिक्य नाहीच!

SCROLL FOR NEXT