देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. जगावर मंदीचं सावट असताना अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे देशाचं लक्ष लागून होतं. अशातच नव्याने चर्चेत असलेला AI प्लॅटफॉर्म ChatGPTने आदर्श अर्थसंकल्प कसा असावा, याबद्दल उत्तर दिलं आहे.
हे उत्तर वाचून आता अर्थमंत्र्यांची काहीही गरज नाही, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांमधून उमटत आहे. ट्वीटरवर अमित परांजपे या युजरने ChatGPTने दिलेलं उत्तर शेअर केलं आहे. अमित यांनी आदर्श अर्थसंकल्प काय असतो, असा प्रश्न ChatGPTला विचारला होता. त्यावर मुद्देसूद उत्तर देण्यात आलं आहे.
ChatGPTने काय उत्तर दिलं?
शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक
रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेचा विकास साधणे
करात सुधारणा करणे, कररचनेत सुलभता आणणे
शेती व ग्रामविकासाला चालना देणे
नवउद्योजकांना चालना देणे व परकीय गुंतवणूक आणणारी धोरणं आखणे
आर्थिक विषमता, गरीबी कमी करण्याकडे लक्ष देणे
कार्बन उत्सर्जन कमी करुन पर्यावरणाला पूरक अशा योजना आखणे
सरकारी खर्च कमी करुन वित्तीय तूट कमी करणे
तंत्रज्ञान, डिजिटल क्षेत्रातली गुंतवणूक वाढवणे
गतिमान प्रशासनासाठी नवीन धोरणं आखणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.