Tax Regime google
Union Budget Updates

Tax Regime : नवी की जुनी; कोणती करप्रणाली तुमच्यासाठी फायदेशीर ?

जुन्या कर प्रणालींतर्गत उपलब्ध असलेल्या सर्व वजावटी आणि सवलती नव्या प्रणालीतून काढून टाकल्या गेल्या.

नमिता धुरी

मुंबई : २०२० च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अधिक कर स्लॅब आणि कमी कर दरांसह नवीन कर प्रणालीची घोषणा केली होती.

बहुतेक करदात्यांनी याची फार पूर्वीपासून मागणी केली होती, परंतु जुन्या कर प्रणालींतर्गत उपलब्ध असलेल्या सर्व वजावटी आणि सवलती नव्या प्रणालीतून काढून टाकल्या गेल्या.

अर्थमंत्र्यांनी करदात्यांना नवीन आणि जुनी प्रणाली यापैकी एक निवडण्याची मुभा दिली. हे सर्व घटक एकत्र काम करत असल्याने कर कायदे सोपे होण्याऐवजी ते आता अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत.

जर तुम्ही नवीन किंवा जुन्या कर पद्धतीची निवड करावी की नाही या संभ्रमात असाल तर आज आपण हा संभ्रम दूर करू. हेही वाचा - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

कोणती करप्रणाली फायदेशीर ? (which Tax Regime is Beneficial)

कराच्या दरात झालेली कपात पाहिली तरी पहिली प्रतिक्रिया अशी असेल की नवीन प्रणाली अधिक चांगली दिसते. यानुसार रु. ७.५ लाख उत्पन्नासाठी रु. २५ हजार आणि ज्यांचे उत्पन्न १० लाख रुपये आहे त्यांच्यासाठी कर बचत रु. ३७ हजार ५०० आहे.

या बचतीसाठी, तुम्हाला सर्व सवलती आणि वजावटींवर पाणी सोडावे लागेल.

तुम्हाला काय करावे लागेल ?

तुम्ही मिळवत असलेल्या सर्व सवलतींची गणना करा. तुम्ही जर भाड्याने राहात असाल, तर तुम्ही HRA चा दावा करत असाल जी सर्वात मोठी सूट आहे.

त्याशिवाय, इतर करमुक्त घटकांमध्ये एलटीए, फूड बिल, फोन बिले इत्यादींचा समावेश आहे. जर तुम्ही नवीन कर प्रणाली निवडली तर हे सर्व करपात्र होतील.

तुम्ही दावा करत असलेल्या वजावटींकडे लक्ष द्या. एक पगारदार कर्मचारी म्हणून, तुम्हाला आपोआप मिळणाऱ्या दोन वजावटी म्हणजे रु. ५० हजारची मानक वजावट आणि तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये तुमचे योगदान.

नवीन नियमावलीत, तुम्ही EPF मध्ये योगदान देत असाल तरीही तुम्ही या कपातीवर दावा करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या गृहकर्जावर किंवा विमा पॉलिसींवर वजावटीचा दावा करू शकत नाही. या वजावटींनी आतापर्यंत तुमचे करपात्र उत्पन्न कमी करण्यास मदत केली आहे.

आता, या सवलती आणि वजावट एकत्र करा आणि तुमचे करपात्र उत्पन्न काय आहे आणि तुम्ही या वजावटी सोडल्यास काय होईल हे पाहण्यासाठी त्यांना तुमच्या पगारातून वजा करा.

जाहीर झालेले बदल भारतीय करदात्यांसाठी खरोखर फार सोपे नाहीत. तुम्ही गुंतवणूक करताना किंवा विमा काढताना नव्या किंवा जुन्या करप्रणालीत मिळणाऱ्या सवलतीचा विचार करणे योग्य ठरणार नाही.

तुमची ध्येये साध्य करणे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे ही तुमची गुंतवणूक आणि विमा खरेदी करण्याचा निर्णय घेण्याचे कारण असावे.

जुन्या प्राप्तिकर प्रणालीतील नवे दर

वार्षिक उत्पन्न (लाखांमध्ये) कर (टक्क्यांमध्ये)

० ते ३ ०

३ ते ६ ५

६ ते ९ १०

९ ते १२ १५

१२ ते २५ २०

१५+ ३०

नव्या करप्रणालीनुसार ७ लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त ठरवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT