Pranab Mukherjee Union Budget speech Sakal
Union Budget Updates

किस्से बजेटचे : प्रणवदांचे रुक्ष भाषण आणि कंटाळलेले विरोधक

अकराला एक मिनिट बाकी असताना पंतप्रधान आणि प्रणवदा एकाच वेळी दोन दरवाजांतून आत आले.

निनाद कुलकर्णी

ना शेरो शायरी, ना शिडकावा, ना विरोधकांचा गोंधळ ना गडबड... एखाद्या कडक मास्तराने हातात छडी घेऊन सलग दोन तास घ्यावेत, असे वातावरण संसदेत बजेटदरम्यान होते. या बजेटवर मुरली मनोहरजोशी (Some Interesting Memories Of 2011 Budget ) यांनी कोपरखळी मारली होती. "प्रणवदांनी आज रवींद्रनाथ टागोरांबाबतच्या घोषणेचाही उल्लेख इतक्या रुक्षपणे केला, की त्या महाकवीला स्वर्गातही हसू आले असेल ", असं त्यांनी म्हटलेलं. हा किस्सा आहे २०११ मधील अर्थसंकल्पादरम्यानचा. २८ फेब्रुवारी २०११ रोजी प्रणव मुखर्जी (Pranav Mukherjee) हे केंद्रीय अर्थमंत्री होते. कमालीच्या एकसुरीपणाने; पण तब्बल १०७ मिनिटे प्रणवदांनी भाषण केले होते. तब्बल आठ वेळा प्रणव मुखर्जींनी अर्थसंकल्प सादर केला आहे. मात्र, २०११ मधील त्याचं बजेट हा कंटाळवाणा होता, अशी टीका विरोधी पक्षांनी केली होती. या बजेटमध्ये नेमके काय घडले होते हे जाणून घेऊया.... (Why Murli Manohar joshi had corner on 2011 Budget)

गोपीनाथ मुंडे आणि असदुद्दीन ओवैसी सर्वात पहिले सभागृहात

साडेदहाच्या सुमारास खासदारांची संसदेत गर्दी होऊ लागली. अर्धवर्तुळाकार लोकसभेतील ५३ प्रखर दिवेही याच सुमारास झगमगले आणि सभागृह शुभ्र प्रकाशझोतात न्हाऊन निघाले. संसद परिसरात खासदारांची गर्दी असली तरी प्रत्यक्ष सभागृहात मात्र सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटे झाली तरी आसने रिकामीच होती. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि असदुद्दीन ओवैसी दोघेच उपस्थित होते. लालूप्रसाद यादव (दुपारी पावणेबारा) व माजी पंतप्रधान देवेगौडा (सव्वाअकरा) हे दोघे सर्वात उशिरा आले. (Interesting Facts About Indian Budget )

राहुल गांधींची दांडी आणि सोनिया, सुषमांची एकाच वेळी एंट्री

काँग्रेसचे राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि राष्ट्रकुल फेम' सुरेश कलमाडी यांनी मात्र या अर्थसंकल्पात दांडी मारली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, पावणेअकराच्या सुमारास एकाच वेळी; पण विरुद्ध दिशेच्या दरवाजांतून आत आल्या. राज्यसभा सदस्यांसाठीच्या गॅलरीत माजी सभापती मनोहर जोशी व रणजितसिंह मोहिते-पाटील सर्वप्रथम येऊन बसले होते. (सर्वप्रथम उठून जाणारे पहिले जोशी सरच होते!)

अन् प्रणवदांनी बजेट सादर केले

अकराला एक मिनिट बाकी असताना पंतप्रधान व प्रणवदा एकाच वेळी दोन दरवाजांतून आत आले. सत्तारूढ आघाडीच्या 1 खासदारांनी बाके वाजवून केलेल्या स्वागताचा सुहास्य मुद्रेने स्वीकार करत प्रणवदा स्थानापन्न झाले. अकरा वाजून तीन मिनिटांनी प्रणवदांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरवात केली. हातातील पेन त्या-त्या शब्दावर ठेवत, खास बंगाली शैलीतील उच्चार करीत अस्खलित इंग्रजीत प्रणवदा बोलू लागले. कमालीच्या एकसुरीपणाने; पण तब्बल १०७ मिनिटे प्रणवदांनी भाषण केले.

विरोधकांची खोचक टीका

अर्थमंत्र्यांकडून जी नेहमीची अपेक्षित नाट्यमयता' दिसते, तीच प्रणवदांनी काढून घेतली, अशी प्रतिक्रिया त्यावेळी संसदेत ऐकायला मिळाली होती. “प्रणवदांनी आज रवींद्रनाथ टागोरांबाबतच्या घोषणेचाही उल्लेख इतक्या रुक्षपणे केला, की त्या महाकवीला स्वर्गातही हसू आले असेल ", अशी कोपरखळी मुरलीमनोहर जोशी यांनी मारली होती. प्रणवदांच्या सहा अर्थसंकल्पांपैकी मी ऐकलेला सर्वात कंटाळवाणा अर्थसंकल्प आजचा होता, असे सांगण्यासही ते विसरले नव्हते. देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याची लोकसभेत नेहमी दिसणारी उत्कंठाही अदृश्य झाल्याचे निरीक्षण राज्यसभेत असलेल्या एका माजी खासदाराने नोंदविले होते. (Why Opposition Party Bored In 2011 Budget)

‘खतम करने दिजीए, बादमे सुनेंगे'

विरोधी बाकांवरून अर्थसंकल्पादरम्यान काही वेळा आरडाओरडा करण्याचा प्रयत्न झालाच, पण प्रणवदांनी, समाप्त होने दिजीए, खतम करने दिजीए, बादमे सुनेंगे', असे इतक्या कडकपणे सांगितले, की विरोधी बाकांवर काही मिनिटांतच शांतता झाली होती.

प्रणवदांचे भाषणच इतके रूक्ष होत होते, की अनेक सदस्यांच्या चेहऱ्यांवर कंटाळा स्पष्ट दिसत होता. अनेकांना जांभया आवरत नव्हत्या. दुपारी एक • वाजून पन्नास मिनिटांनी प्रणवदांनी भाषण पूर्ण केल्यानंतर त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हे न उमगल्याने काही सेकंद सभागृहात दिसलेली स्तब्धता एकूण वातावरणाची कल्पना देऊन गेलेली.

चलनवाढ, कृपी, शिक्षण, सामाजिक आदी क्षेत्रांसाठीच्या नव्या योजना, करप्रस्ताव आदी भागांत विभागलेले भाषण जसजसे वाचले जात होते, तसतसा त्यात टीका करण्याजोगा अंशही न दिसल्याने विरोधी बाकांवर चुळबूळ वाढू लागली.

'इंद्राची व लक्ष्मीची मी प्रार्थना करतो, या प्रणवदांच्या वाक्यावरही हास्यकल्लोळ नव्हे, तर पुसटसे हसू फुटले होते, असे वृत्त त्यावेळी छापून आले होते.

(संदर्भ सकाळ ग्रंथालय)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT