नवी दिल्ली : वार्षिक अर्थसंकल्पाची घोषणा ऊद्या होणार असून आज देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी (President Ramnath Kovind) स्टार्टअपसंदर्भातील माहीती जाहीर केली आहे. भारतात २०१६ पासून साठ हजार नवे स्टार्टअप सुरु झाले आहेत आणि यापासून जवळपास ६ लाख नवीन रोजगाराची निर्मिती झाली आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी संसदेत बोलताना म्हटलंय.(India's New StartUps Since 2016)
संसदेत उद्या वार्षिक अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पाकडे देशातील सगळ्याच जनतेचे लक्ष लागले आहे. या अर्थसंल्पाच्या पहिल्या दिवशीच्या संसदेत आज बोलताना राष्ट्रपती कोविंद यांनी स्टार्ट्सअप संदर्भातील माहीतीचा हा मुद्दा मांडला आहे. बोलताना ते म्हणाले की, आपले नवे स्टार्ट्सअप हे तरुणांच्या नेतृत्वाखाली आकार घेणारे आणि नव्या संकल्पनेला जन्म देणारे आहेत असं ते बोलताना म्हणाले. आपल्या देशात मागील ६ वर्षापासून म्हणजेच २०१६ पासून ५६ प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रात जवळपास ६०००० नवे उद्योग सुरु झालेले आहेत. आणि यामुळे देशातील सुमारे ६ लाख नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
मागच्या वर्षी कोरोनाच्या काळात देशात एक अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक बाजारमूल्य असणाऱ्या ४० स्टार्टअप सुरु झाले आहेत. या स्टार्टअपची सध्याची मार्केट किंमत ही ७४०० कोटींपेक्षा अधिक आहे असंही ते बोलताना म्हणाले.
तसेच बदलत्या तंत्रज्ञानानुसार तरुणांना फायदा व्हावा या दृष्टीकोनातून सरकारने नवीन निर्णय घेऊन अनेक नवीन क्षेत्रातील नव्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच हे स्टार्टअप सुरु झाल्यापासून सरकारने पेटंट आणि व्यापारचिन्ह (लोगो) संदर्भातील प्रक्रिया जास्त सोपी केली आहे. त्यामुळे मागच्या आर्थिक वर्षात ६००० नवे पेटंट आणि २०००० नवे व्यापारचिन्हांसाठी (Trademarks) अर्ज दाखल झालेले आहेत असंही त्यांनी बोलताना नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.