कोल्हापूर: भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार असंवेदनशील आहे. त्यांनी भारतातील सामान्य माणसाचा आवाज न ऐकण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते आहे. म्हणूनच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करताना आयकर सवलतीत कोणताही बदल केलेला दिसत नाही अशी नाराजीचा पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प (Budget 2022) विषयी खंत व्यक्त केली.
कोविडच्या काळात संकटात सापडलेल्या मध्यमवर्गीयांसाठी आयकर सवलतीत कोणताही बदल झालेला नाही. मध्यमवर्गीय आणि पगारदारांच्या पदरी निराशाच पडली आहे. भारतातील पगारदार वर्ग आणि मध्यमवर्गाचा हा विश्वासघात आहे, असा टोला सतेज पाटील यांनी लगावला आहे. त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे ट्विट शेअर केले आहे. ज्यात राहुल गांधी यांनी पगारदार वर्ग, मध्यमवर्ग, गरीब आणि वंचित, तरुण, शेतकरी, एमएसएमई यांच्यासाठी काहीही नाही अशी नाराजी व्यक्त केली आहे.
राहुल गांधी नाराज
देशातील जनता करवसुलीच्या ओझ्याने हैराण आहे. मात्र मोदी सरकार कर मिळवण्याच्या मागे लागली आहे. त्यांना फक्त त्यांचा खजिना दिसतो आहे. लोकांच्या वेदना दिसत नाहीत. अशी टीका भाजपावर केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.