Interesting Facts About Union Budget  Google
Union Budget Updates

Budget 2022 : 'या’ अर्थमंत्र्यांनी मांडला नव्हता एकही अर्थसंकल्प! वाचा असं का?

वाढत्या महागाईने हैराण झालेल्या जनतेचे डोळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागले आहेत.

निनाद कुलकर्णी

Budget 2022 : वाढत्या महागाईने हैराण झालेल्या जनतेच्या नजरा 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पीय (Indian Union Budget 2022-23) अधिवेशनाकडे लागले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात साथीच्या तिसऱ्या (Pandemic Third Wave) लाटेपासून सर्वसामान्यांना वाचवून अर्थव्यवस्थेला (Economy) चालना देण्याचा विचार केला जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला बजेटशी संबंधित अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. तसेच अशा एका अर्थंमंत्र्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी एकही अर्थसंकल्प मांडला नव्हता. (Some Interesting Facts About Indian Union Budget)

या तारखेला सादर झाला होता पहिला अर्थसंकल्प

अर्थसंकल्पात सरकारकडून आगामी वर्षाचे उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा मांडला जातो. ब्रिटनमध्ये वर्षभरातील देशाच्या उत्पन्न आणि खर्चाच्या खात्याचे सादरीकरण सरकारने सुरू केले. ब्रिटीशांच्या काळात भारतात पहिल्यांदा 7 एप्रिल 1860 रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. वित्त सदस्य जेम्स विल्सन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता. स्वातंत्र्यानंतर ब्रिटनचाच अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत पुढे नेण्यात आली. (First Indian Budget Announced on Which day)

'या' अर्थमंत्र्यांना एकही अर्थसंकल्प मांडता आला नाही

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आपल्या देशात असे एक अर्थमंत्री झाले आहेत, ज्यांनी कोणताही अर्थसंकल्प सादर केला नाही. 1948 मध्ये 35 दिवस अर्थमंत्री राहिलेले केसी नियोगी हे एकमेव अर्थमंत्री होते ज्यांनी एकही अर्थसंकल्प सादर केला नाही. त्यांच्यानंतर जॉन मथाई हे भारताचे तिसरे अर्थमंत्री झाले. (KC Noyogi Could Not Present a Single Budget)

अर्थसंकल्प कधी सादर होतो

आता अर्थसंकल्प दुपारी अकरा वाजता सादर केला जातो. मात्र, यापूर्वी ब्रिटीशांच्या काळात संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर केला जात होता. अर्थसंकल्पावर रात्रभर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना थोडी विश्रांती मिळावी म्हणून हा बदल करण्यात आला.

मोरारजी देसाई यांनी सादर केला सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प

मोरारजी देसाई यांनी भारतात सर्वाधिक वेळा भारताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री म्हणून मोरारजी देसाई यांनी दहा वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात आठ अर्थसंकल्प आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प आहेत. (Morarji Desai )

लाल बॅगेची परंपरा संपली

आधी ब्रिटनचे अर्थमंत्री संसदेत सरकारच्या खर्चाची आणि उत्पन्नाची माहिती देत ​​असत आणि ती लाल चामड्याच्या पिशवीत आणली जायची, पण भाजप सरकारने लाल पिशवीची परंपरा संपवली.

जीएसटीचा पहिला उल्लेख

28 फेब्रुवारी 2006 रोजी तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम अर्थसंकल्पात पहिल्यांदा जीएसटीबद्दल बोलले होते. UPA-2 च्या कार्यकाळात पहिल्यांदाच राष्ट्रीय एकल कराची चर्चा चिदंबरम यांनी केली होती. (GST)

पायाभूत सुविधांची चर्चा कधी झाली?

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 30 वर्षे सादर करण्यात आलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातही पायाभूत सुविधा हा शब्द वापरला गेला नाही. हा शब्द 1990 मध्येच चर्चेचा विषय बनला आणि आज पायाभूत सुविधा देऊन अर्थव्यवस्थेत आपले विशेष स्थान टिकवून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT