budget 2024 congress esakal
Union Budget Updates

Union Budget 2024: "काँग्रेसचा जाहिरनामाचं सीतारामन यांनी वाचून दाखवला"; चिदंबरम यांचा बजेटवरुन हल्लाबोल

Nirmala Sitaraman Budget 2024: माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आजच्या केंद्रीय बजेटवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी आणलेला जाहीरनाम्यातीलच घोषणा केल्याचा दावा केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आजच्या केंद्रीय बजेटवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी आणलेला जाहीरनाम्यातीलच घोषणा केल्याचा दावा केला आहे. आमचाच जाहीनामा अर्थमंत्री सीतारामन यांनी वाचून दाखवल्याबद्दल आम्हाला आनंद आहे, अशी खोचक प्रतिक्रिया चिदंबरम यांनी बजेटवर दिली आहे.

कोणत्या योजनेवर घेतला काँग्रेसनं आक्षेप

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय बजेटमध्ये पंतप्रधान इंटर्नशीप योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत तरुणांना इंटर्नशीपच्या एक वर्षाच्या कालावधीत प्रत्येक महिन्याला ५,००० रुपये भत्ता देण्यात येणार आहे.

पण याच योजनेवर काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटलं की, केंद्र सरकारनं ज्या इंटर्नशीप योजनेची घोषणा केली आहे. ही घोषणा काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी आणलेल्या जाहीरनाम्यातच केली होती. आमच्या घोषणेनुसार, डिप्लोमा किंवा डिग्री घेतलेल्या बेरोजगार तरुणांना प्रशिक्षणासह एक वर्षासाठी ८,५०० रुपये देण्यात येणार होते. या योजनेला काँग्रेसनं 'पहिली नोकरी पक्की' असं नावही दिलं होतं.

सीतारामन यांनी काँग्रेसचा जाहीरनामा वाचला

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आजच्या बजेटवरुन तोंडसुख घेतलं. त्यांनी म्हटलं की, मला या गोष्टीचा आनंद होतोय की अर्थमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचा लोकसभेचा जाहीरनामा वाचला आहे. मला या गोष्टीचा आनंद वाटतोय की, त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या ३०व्या पानावर उल्लेख केलेल्या रोजगाराशीसंबंधीत मुद्दा स्विकारला आहे.

चिदंबरम यांनी पुढे म्हटलं की, मला या देखील गोष्टीचा आनंद आहे की, सीतारामन यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील पान क्र. ११वर उल्लेख असलेल्या प्रत्येक ग्रॅज्युएट तरुणासाठी देण्यात येणाऱ्या भत्त्याची योजना सुरु केली. अर्थमंत्र्यांनी काँग्रेसच्या घोषणापत्रातील इतरही काही मुद्द्यांची कॉपी करायला हवी होती. मी लवकरच सुटलेले बिंदू जोडणारी एक यादी तयार करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

ACMC Solar Holding : एसीएमसी सोलर होल्डिंग्सच्या आयपीओकडून गुंतवणुकदारांची निराशा, शेअर्स 13% डिस्काउंटवर लिस्ट...

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

SCROLL FOR NEXT