Union Budget 2024  sakal
Union Budget Updates

Union Budget 2024 : अर्थसंकल्पावर शेअर बाजारात नाराजीचा सूर;‘सेन्सेक्स’, ‘निफ्टी’मध्ये अल्प घसरण

सरकारने आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प आज सादर केला. मात्र, गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या घोषणा नसल्याने तसेच शेअरवरील दीर्घकालीन भांडवली नफा कर आणि फ्युचर्स-ऑप्शन्स व्यवहारांवर कर वाढविल्यामुळे शेअर बाजारात निरुत्साही वातावरण निर्माण झाले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सरकारने आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प आज सादर केला. मात्र, गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या घोषणा नसल्याने तसेच शेअरवरील दीर्घकालीन भांडवली नफा कर आणि फ्युचर्स-ऑप्शन्स व्यवहारांवर कर वाढविल्यामुळे शेअर बाजारात निरुत्साही वातावरण निर्माण झाले. दिवसभरात आज शेअर बाजारात अनेक चढ-उतार दिसून आले. दिवसभरात ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ने जोरदार घसरण नोंदवली. दिवसअखेर करसवलत आणि सीमाशुल्क कपातीमुळे ग्राहकोपयोगी वस्तू आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर वधारल्याने निर्देशांक नीचांकी पातळीवरून सावरले.

दिवसअखेर ‘सेन्सेक्स’ ७३ अंशांनी घसरून ८०,४२९ अंशांवर स्थिरावला, तर ‘निफ्टी’ ३० अंशांनी घसरण नोंदवत २४,४७९ अंशांवर बंद झाला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फ्युचर्स-ऑप्शन्स व्यवहारांवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन कर आणि शेअरवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील कर यात वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर निर्देशांकांनी जोरदार घसरण नोंदवली. दिवसभरात ‘सेन्सेक्स’ने तब्बल १२०० अंशांची घसरण नोंदवत ७९,२२४ अंशांची नीचांकी पातळी गाठली होती, तर निफ्टी दिवसभरात ४३५ अंशांची घसरून २४,०७४ अंशांवर पोहोचला होता. बाजाराची सुरुवातही नकारात्मक झाली होती. दुपारच्या सत्रात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सरकारचा हिस्सा कमी करण्याबाबत काही घोषणा न झाल्याने बँकिंग क्षेत्रात नफावसुली झाली. त्यामुळे बँकांचे शेअरही घसरले. तसेच जहाज बांधणी उद्योगाच्या अपेक्षांची पूर्तता न झाल्यामुळे माझगाव डॉक, शिपिंग कॉर्पोरेशन या कंपन्यांचे शेअरही घसरले.

सेन्सेक्स’वर टायटनने सहा टक्क्यांहून अधिक उसळी घेतली, त्यानंतर आयटीसीने पाच टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. अदानी पोर्ट, एनटीपीसी, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि सन फार्मा यांनीही वाढ नोंदवली. तर लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक यांनी घसरण नोंदवली.

गत अर्थसंकल्पाच्या दिवशी

सेन्सेक्सची प्रतिक्रिया

एक फेब्रुवारी २०२३ : सेन्सेक्स १५८ अंशांनी वाढून

५९,७०८ अंशांवर

२०२२ : सेन्सेक्स ८४८ अंशांनी वाढून ५८,८६२ अंशांवर

२०२१ : सेन्सेक्स २३१४ अंशांनी वाढून ४८,६०० अंशांवर

२०२० : सेन्सेक्स ९८७ अंशांनी घसरून ३९,७३५ अंशांवर

२०१९ : २१२ अंशांनी वाढून ३६,४६९ अंशांवर

निफ्टीची स्थिती

एक फेब्रुवारी २०२३ : ४५.८५ अंशांनी वाढून

  • १७,६१६ अंशांवर

  • २०२२ :२३७ अंशांनी वाढून १७,५७६ अंशांवर

  • २०२१ : ६४६ अंशांनी वाढून १४,२८१ अंशांवर

  • २०२० : ३०० अंशांनी घसरून ११,६६१अंशांवर

  • २०१९ : ६२.७० अंशांनी वाढून १०,८९३ अंशांवर

शेअरवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील कर दहा टक्क्यांवरून साडेबारा टक्के व अल्पकालीन नफ्यावरील कराचा दर १५ टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आला आहे; तसेच फ्यूचर्स व ऑप्शन्समधील व्यवहारांवर सिक्युरिटी ट्रॅन्झॅक्शन टॅक्स ०.०२ टक्के करआकारणी हा मोठा धक्का आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. सेन्सेक्सने दिवसभरात एक हजारांहून अधिक अंशांची घसरण नोंदवली. मात्र, सरकारचे कमी वित्तीय तुटीचे उद्दिष्ट, पायाभूत सुविधांवरील वाढीव खर्च व ग्रामीण खर्चावर लक्ष यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला दोन्ही निर्देशांकांनी सर्व नुकसान भरून काढत दिवसअखेर किरकोळ घट नोंदवली.

- प्रशांत तपासे, वरिष्ठ उपाध्यक्ष, मेहता इक्विटीज लि.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT