BT-Seed esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agriculture News : जिल्ह्यात सव्वादहा लाख बीटी बियाणे पाकिटांची गरज

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यात खरीप हंगाम लागवडीचे क्षेत्र तीन लाख ८४ हजार १५९ हेक्टर एवढे असून यात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे आहे. त्यानंतर मका, बाजरी, सोयाबीन, ज्वारीचे क्षेत्र आहे.

कापूस (Cotton) लागवडीसाठी यंदा बीटी बियाणांची दहा लाख ३० हजार ६४० पाकिटांची आवश्यकता आहे. (1 million 30 thousand 640 packets of Bt seeds are required for Cotton cultivation dhule news)

या वर्षासाठी ९४ हजार ३८० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर आहे. ४७ हजार ४७२ मेट्रिक टन खताचा साठा शिल्लक आहे. जिल्हा व तालुकास्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण पाच गुणनियंत्रण भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

खरीप हंगामासाठी कृषी विभागातर्फे खत व बियाण्यांचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यात दोन लाख ७९ हजार ६२९ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्याचे नियोजन असून २०२० च्या तुलनेत यंदा पेरणी लायक क्षेत्र घटले असले तरी २०२२ च्या तुलनेत ते जास्त आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच आढावा बैठक झाली.

जिल्ह्यात यंदा तीन लाख ८४ हजार १५९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या प्रस्तावित आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सहा हजार हेक्टर अतिरिक्त क्षेत्रावर पेरण्या होणार आहे. यंदा खरीप हंगामात दोन लाख नऊ हजार चार हेक्टर क्षेत्रावर संकरित बीटी कापूस लागवड तर दोन हजार हेक्टर क्षेत्रावर सुधारित कापूस लागवड होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्या खालोखाल ५७ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावर मका, ५४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर संकरित बाजरीची पेरणी अपेक्षित आहे. संकरित ज्वारीची पेरणी आठ हजार ४२९ हेक्टरवर, सुधारित ज्वारी ३०० हेक्टरवर, भात पाच हजार ७१२ हेक्टरवर, नागली दोन हजार १०० हेक्टरवर, सोयाबीन १६ हजार ४२५ हेक्टरवर, भुईमूग दहा हजार ३९० हेक्टरवर, सूर्यफूल २१७ हेक्टरवर, तीळ ३५७ हेक्टरवर, तूर पाच हजार १९२ हेक्टरवर, मूग दहा हजार ५८२ हेक्टरवर प्रस्तावित आहे.

दरम्यान, जिल्ह्यात १५ मेनंतर कपाशीच्या बियाण्यांची लागवड होते. मात्र, यावर्षी एक जूनपर्यंत कपाशीचे बियाणे विक्रीस बंदी आहे. दुसरीकडे बागायतदार शेतकऱ्यांकडून कपाशी लागवडीची घाई केली जात आहे. कपाशीच्या बियाण्यांची विक्री होत नसल्याने काळ्या बाजारातून गुजरात बीटी खरेदीचा धोका वाढला असल्याचे चित्र आहे.

"शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीची घाई करू नये. काही दिवसांपासून उन्हाचा प्रकोप वाढला आहे. त्यामुळे जमिनीचे तापमान वाढत आहे. परिणामी पाण्याची कमतरता जाणवत आहे. याकाळात पेरणी केली तर बियाण्यांची उगवण क्षमता कमी होते. त्यामुळे एक जूननंतर कपाशीची लागवड करावी." - यू. टी. गिरासे, कृषी अधिकारी, धुळे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT