10 Crore Road and Sewer Standing Committee approved in Dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यात 10 कोटींतून रस्ते, गटारी; स्थायी समितीची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत एकूण दहा कोटी ३९ लाख रुपये खर्चातून धुळे शहरातील विविध प्रभागांत एकूण २८ रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, बंदिस्त गटार, पाइपलाइन, बैठकव्यवस्था आदी कामे करण्यास स्थायी समितीने गुरुवारी (ता. १५) मंजुरी दिली. (10 Crore Road and Sewer Standing Committee approved in Dhule news)

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजना-२०२२-२३ अंतर्गत रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरणासह बंदिस्त गटार, पाइपलाइन, बैठकव्यवस्था आदी कामांना २५ मार्च २०२३ ला जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी देण्यात आली. या कामासाठी एकूण दहा कोटी ३९ लाख ८२ हजार ३८८ खर्चास आर्थिक व प्रशासकीय मान्यता आहे.

या खर्चास तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर निविदा मागविण्यात आल्या. या प्रक्रियेत मे. जय कन्स्ट्रक्शन (शेकडा ७.०० टक्के जास्त), एन. एम. सोनवणे (०.००१ टक्के), डी. आर. पाटील कन्स्ट्रक्शन प्रा.लि. (१.०० टक्के जास्त) अशा निविदा प्राप्त झाल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यात एन. एम. सोनवणे यांची सर्वांत कमी दराची अर्थात दहा कोटी ३९ लाख ८१ हजार ३४९ रुपयांची निविदा होती. स्थायी समितीने त्यांना काम देण्यास मंजुरी दिली.

ही कामे प्रभाग १, २, ३, ४, ५, ६, ८, १०, ११, १४, १९ मध्ये करण्यात येणार आहेत. यात ४९ लाख ९५ हजार १०० रुपये खर्चातून देवपूर अमरधाम येथे गॅस दाहिनी भागात नागरिकांसाठी बैठकव्यवस्था, तर ३४ लाख ९२ हजार ८७८ रुपये खर्चातून प्रभाग ६ मधील मोराणे गावात हनुमान टेकडी ते मोराणे गावापर्यंत पाइपलाइन टाकण्याच्या कामांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT