108 Emergency service esakal
उत्तर महाराष्ट्र

तात्काळ उपचारासाठी असलेल्या 108 सेवेलाच तातडीच्या उपचारांची गरज!

शासनाकडून १०८ क्रमांक डायल केल्यावर पुरविली जाणारी रुग्णवाहिका सेवा ही खरंतर अनेक रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेली आहे.

जगदीश शिंदे

साक्री (जि. धुळे) : शासनाकडून १०८ क्रमांक डायल केल्यावर पुरविली जाणारी रुग्णवाहिका सेवा ही खरंतर अनेक रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेली आहे. मात्र सध्या याउलट चित्र साक्री तालुक्यात पहावयास मिळत आहे. तालुक्यासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका संख्या फक्त चार आहे. त्यात पिंपळनेर व दहिवेल येथील रुग्णवाहिका नादुरूस्त असून दोन रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने प्रतापपूर (ता.साक्री) येथील बालकाला पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर धुळ्यात हलविण्याची वेळ आली तेव्हा १०८ सेवेलाच तातडीच्या उपचारांची गरज असल्याचा प्रत्यय कुटुंबीयांच्या पालकांना आला. (Latest Marathi News)

संबंधित बालकाला तत्काळ उपचारांची गरज असल्याने रुग्णाच्या नातेवाइकांना मदतीसाठी पुढे आलेल्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अनिल देसले, हर्षल ठाकरे, अमोल गांगुर्डे, मनोज शिंदे यांनी बालकाच्या वडिलांना काही रुपयांची मदत करून खासगी वाहनाने धुळे येथे पाठविले.

असा घडला प्रकार

प्रतापपूर (ता. साक्री) येथील आदिवासी वस्तीतील कृष्णा विकास गायकवाड (वय ६) या बालकाला पिसाळलेल्या कुत्र्याने चेहऱ्याला व डोक्याला चावा घेतला. त्याच्या पालकांनी कासारे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. बालकाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय साक्री येथे उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. वडील विकास गायकवाड यांनी साक्री ग्रामीण रुग्णालय गाठले.

जखमी बालकाला ग्रामीण रुग्णालयातील डॉ. विवेक जाधव यांनी तपासणी करून धुळे जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्यांनी कागदपत्रे तयार करून दिले. रुग्णाच्या वडिलांनी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क केला. त्यांना पेशंटचे नाव, वय, पत्ता, नाते याबाबत माहिती घेतली. त्यानंतर निजामपूर येथील रुग्णवाहिका पेशंट घेऊन गेलेली आहे. पिंपळनेर तसेच दहिवेल येथील १०८ रुग्णवाहिका नादुरुस्त आहेत, तर साक्री येथील १०८ रुग्णवाहिका धुळ्यावरून निघाली असून, साधारणत: एक दीड तासात साक्री येथे पोचेल असे सांगितले.

''वैद्यकीय सेवेची झालेली वाताहत निश्चितच गरजू रूग्ण आणि रूग्णाच्या नातेवाइकांना मनस्ताप देणारी आहे. या सर्व गोष्टींकडे तालुका वैद्यकीय अधिकारी, तसेच तालुक्यातील तमाम लोकप्रतिनिधींनी वैयक्तिक लक्ष घालण्याची गरज आहे. १०८ रुग्णवाहिकेच्या संबंधी प्रादेशिक कार्यालय मुंबई येथे तक्रार दाखल करणार करणार आहोत.'' - अनिल देसले, अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती

''तालुक्यातील दोन रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी दिल्या आहेत. निजामपूर आणि साक्री येथील रुग्णवाहिका रूग्ण ने-आण करीत आहेत. अशावेळी रुग्णवाहिका येण्यासाठी थोडाफार वेळ लागणे स्वाभाविक आहे. अशात संबंधितांनी तत्काळ रुग्णवाहिका मागितली. मात्र रुग्णवाहिका ही धुळे येथून येणार असल्याने वेळ लागणार होता. मात्र तेवढा वेळ न थांबता संबंधित खासगी वाहनाने धुळे येथे पोचले.'' - प्रशांत सांगळे, जिल्हा समन्वयक,१०८ रुग्णवाहिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT