Post Account, Officers of Bajaj Allianz Company while issuing the accident insurance amount check to the heirs of the beneficiary. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : विम्यासह 11 लाखांचा धनादेश वारसांना प्रदान; पतीच्या निधनानंतर कुटुंबाला आधार

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पतीच्या अपघाती निधनानंतर पत्नीसह कुटुंबापुढे आर्थिक प्रश्‍न उभा राहिला. मात्र, पोस्टाच्या विम्याचा आधार या कुटुंबाला मिळाला.

डाक विभाग व बजाज अलियान्झ इन्शुरन्स कंपनीकडून नुकताच मृताच्या वारसाला अपघाती विम्याचे दहा लाख व इतर एक लाख असा एकूण ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.(11 lakh check with insurance given to family from Posts and Bajaj Allianz Insurance dhule news)

जितेंद्र वसंत शिरसाट (रा. नवी भोई गल्ली, शहादा, जि. नंदुरबार) यांनी नंदुरबार डाक कार्यालयातून विमा काढला होता. दुर्दैवाने २१ जून २०२३ ला त्यांचे निधन झाले. त्यांच्या वारसाद्वारे या अपघाती विम्याचा दावा बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीकडे करण्यात आल्यानंतर या योजनेत डाक विभागातर्फे तातडीने विम्याचा दावा सादर करण्यात आला.

तसेच डाक विभाग व बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीने तत्काळ सर्व कागदपत्रे तपासून वारसदाराचा दावा मान्य केला. त्यानंतर दिवंगत जितेंद्र शिरसाट यांच्या पत्नी सुजाता सुभाष बच्छाव यांना अपघाती विमा दाव्याचा दहा लाख रुपये तसेच मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख असा एकूण ११ लाखांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

धनादेश प्रदान कार्यक्रमाला आयपीपीबीचे धुळे शाखाधिकारी श्रीकांत देशमुख, धुळे डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक प्रताप सोनवणे, हेड पोस्टमास्तर ज्ञानेश्‍वर सूर्यवंशी, बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचे रिजनल सेल्स मॅनेजर अभिजित इंदलकर आदी उपस्थित होते. बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचे दिगंबर हिरे यांनी सूत्रसंचालन केले.

विनोद मोरे, संतोष थोरात यांनी आभार व्यक्त केले. भारतीय डाक विभाग, धुळे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक तथा बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्यातर्फे जनसामान्यांना अपघाती विमा संरक्षण मिळावे, या उद्देशाने जनरल इन्शुरन्सचा वार्षिक ३९६ रुपयांचा अपघाती विमा प्रदान करण्यात येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT