Mangalabai Cheetahe esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 12 प्लॉट हडपल्याची तक्रार; मंगलाबाई चित्तेंचा चौपदरीकरणातील भूंसपादनावर आक्षेप

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनच्या चौपदरीकरणांतर्गत भूसंपादनावेळी बारा प्लॉट हडपले गेले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनच्या चौपदरीकरणांतर्गत भूसंपादनावेळी बारा प्लॉट हडपले गेले. हक्काची मालमत्ता हडपली तरी गेल्या सहा वर्षांपासून न्याय मिळत नसल्याची कैफियत मंगलाबाई चित्ते यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

त्यांना अन्यायाची माहिती देताना रडू कोसळले. या प्रकरणी न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (12 plot grab incidents Objection to land acquisition dhule news)

श्रीमती चित्ते, संदीप जोशी, निवृत्ती गवळी म्हणाले, की मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक तीनच्या चौपदरीकरणात रीतसर संपादन न करता बाधित झालेल्या आर्वी (ता. धुळे) येथील सिटी सर्व्हे क्रमांक ८३० ते ८२१ असे एकूण १२ रहिवासी प्लॉट कुठलीही पूर्वसूचना न देता संपादित करण्यात आले.

त्या प्लॉटचा मोबदला मिळाला नाही. मोजणी करताना आमची जागा महामार्गाच्या कामात वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले.

आर्वी गावठाण भूमापन क्रमांक तीन १९८७ च्या नकाशानुसार आमची मालमत्ता सुरक्षित आणि व्यवस्थित होती. नंतर १४ मार्च २०२२ ला भूमिअभिलेख विभागामार्फत परिरक्षक भूमापक बोरकुंड यांच्यामार्फत मोजणी केली असता आमची मालमत्ता चौपदरीकरणात बाधित झाल्याचे लक्षात आले.

२००६ मध्ये भूसंपादन विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जमिनीची मोजणी करून संबंधित प्लॉटधारकांना नोटीस न देता आमच्या मालमत्तांचा वापर केला.

उपअधीक्षक भूमिअभिलेख यांच्याकडून संबंधित जमीन मोजणी केली असता त्यात आमच्या मालमत्ता गावाजवळील उड्डाणपुलाखाली बाधित झालेल्या दिसत आहेत. तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांनी वेळकाढू धोरण अवलंबले. त्यामुळे २८ ऑगस्ट २०२३ ला जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

नकाशा तपासणीतून योग्य ती कार्यवाही होण्यासाठी गेलो असता उपजिल्हधिकाऱ्यांनी काहीही ऐकून न घेता हीन वागणूक दिली. गावातील काही स्वयंघोषित पुढारी, तत्कालीन पदाधिकाऱ्यांचा या प्रकरणात हस्तक्षेप आहे का? गावठाणाच्या नावाने कोणी भरपाईचे पैसे लाटले का? याबाबत चौकशीअंती आमचे प्लॉट मिळवून द्यावेत, अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करू, असा इशारा श्रीमती चित्ते यांनी पत्रकार परिषदेतून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT