Former MLA Rajvardhan Kadambande and dignitaries greeting on occasion of Chhatrapati Rajaram Maharaj's birth anniversary with idol worship on Sunday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : राजाराम महाराजांची १२५ वी जयंती साजरी

सकाळ वृत्तसेवा

धुळे : श्रीमंत छत्रपती राजाराम महाराजांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त येथे रविवारी कार्यक्रम झाला. त्यांचे नातू तथा धुळे- नंदुरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमापूजनासह अभिवादनाचा कार्यक्रम झाला. (125th birth anniversary celebration of chhatrapati Rajaram Maharaj dhule Latest Marathi News)

श्री. कदमबांडे यांनी सांगितले, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या निधनानंतर २१ मे १९२२ ला छत्रपती राजाराम महाराज यांचा कोल्हापूरचे दहावे अधिपती म्हणून राज्याभिषेक झाला.

वडील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पावलावर पावले टाकत छत्रपती राजाराम महाराज यांनी अनेक लोककल्याणकारी व जनसेवेची कामे पार पाडली. यात कोल्हापूर शहरात शालिनी पॅलेस, बीटी कॉलेज, शिवाजी टेक्निकल, ट्रेझरी, राधाबाई बिल्डींग (जुने कोर्ट), कलेक्टर ऑफिस, विधी महाविद्यालय आदी वास्तू आहेत.

काळाच्या ओघात किंवा काही कटकारस्थानामुळे राजाराम महाराजांचे कार्य जनतेसमोर येऊ न देण्याचे षडयंत्र काही जणांनी केले. केवळ वास्तूच नव्हे, तर १९२२ ते १९४० अशी एकूण १८ वर्षे त्यांनी कोल्हापूर संस्थानाचा कारभार पाहिला. शाहू महाराजांनी सुरू केलेले राधानगरी धरणाचे काम त्यांनी पूर्णत्वास नेले, असेही श्री. कदमबांडे यांनी नमूद केले. मुन्ना शितोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT