Sarangkheda: Jaipal Singh Rawal welcoming 14-year-old Hriday who reached Sarangkheda on horseback esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : 14 वर्षीय हृदयाने घोडेस्वारी करत गाठले सारंगखेडा

सकाळ वृत्तसेवा

शहादा : हृदया पृथ्वीराज अंडे... वय वर्ष १४.... ही बालिका दररोज ५० ते ६० किलोमीटरची घोडेस्वारी करीत २५० किलोमीटरचा पल्ला चार दिवसांत पूर्ण करून बुधवारी सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये दाखल झाली.

बाल वयातही हृदयाची जिद्द आणि घोडेस्वारी पाहून सारेच थक्क झाले. तिचे चेतक फेस्टिवलतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्यासह अधिकाऱ्यांनी स्वागत आणि सत्कार केला.

नाशिक ते सारंगखेडा हे सुमारे अडीचशे किलोमीटरचे अंतर घोड्यावर पार करत चेतक फेस्टिवलसाठी नाशिक येथील १४ वर्षीय युवती हृदया पृथ्वीराज अंडे ही बुधवारी (ता.२१) सारंगखेडा येथे दाखल झाली. (14 Year old Hriday reach Sarangkheda riding a horse girl honor at hands of Collector Nandurbar News)

समितीतर्फे जयपालसिंह रावल यांनी तिचे स्वागत केले. यावेळी हृदया म्हणाली, की मोठा खडतर प्रवास करीत मी हे अंतर पार केले याच्या आनंद वाटतो. मला वडील पृथ्वीराज अंडे, आई जयश्री अंडे, विशालराजे भोसले, अनिकेत गायकवाड, अभिजित नडगे, गोलू पाटील, राम वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. अश्वांची माहिती आजच्या युवकांना व्हावी, मुलींनीही पुढे येऊन अश्वभ्रमंती, खेळ, स्पर्धा यामध्ये सहभाग घेऊन पुढे यावे, तसेच अश्वाच्या इतिहास प्राचीन काळापासून आहे. त्याचे महत्त्व शौकिनांना कळावे, अश्वांसह चेतक महोत्सवाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हा या मागच्या उद्देश असल्याचे सांगितले.

नाशिक ते सारंगखेडा दरम्यान प्रत्येक गावात तिच्या सन्मान करण्यात आला. महिला औक्षण करीत होते. तिच्या या प्रवासामुळे सर्वात लहान वयात अडीचशे किलोमीटर भ्रमंती करण्याच्या तिच्या विक्रम झाला आहे.

अशी घेतली विश्रांती...

१७ डिसेंबरला सकाळी आठ वाजता नाशिकहून कुटुंबासह निघालेल्या हृदयाने पहिला मुक्काम चांदवड येथे केला. दुसरा मुक्काम झोडगा, तिसरा मुक्काम सोनगीर तर शेवटचा मुक्काम दोंडाईचा येथे करत सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवल गाठले.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

व्यासपीठावर सन्मान...

हृदयाच्या सन्मान जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केला. यावेळी पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, उपविभागीय अधिकारी महेश शेलार, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पोलिस निरीक्षक राजेश शिरसाट, सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, प्रणवराजसिंह रावल आदी उपस्थित होते.

"अडीचशे किलोमीटरच्या प्रवास करताना असंख्य लोकांनी गावागावातून शुभेच्छा दिल्या. त्या शुभेच्छाच्या बळावर इथपर्यंत पोहोचलो. प्रशिक्षक विशालराजे भोसले यांनी चेतक फेस्टिवलला जाण्याचे ठरवले. त्यात डॉ. शफीक, मुन्ना दादांचे ही मार्गदर्शन मिळाले आणि इथपर्यंत पोहोचलो."

- पृथ्वीराज भरत अंडे, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT