धुळे : शहरात भक्तिमय वातावरणात गुरुवारी (ता. ६) सकाळी नऊला अग्रवाल परिवाराच्या हस्ते विधीवत आरती झाल्यानंतर श्री बालाजी रथोत्सवाला सुरवात झाली. कोरोना गेल्यानंतर दोन वर्षांनी निघालेल्या रथोत्सवामुळे आबालवृद्धांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रथोत्सवात तरुण- तरुणींचे ढोल पथक, बारापावली नृत्य लक्षवेधी ठरले. (142 year old tradition in devotional atmosphere Balaji Rathotsav begins dhule latest news)
‘व्यंकट रमणा गोविंदा’... ‘बालाजी भगवान की जय’, अशा जयघोषात रथोत्सव सुरू झाला. आकर्षक फुलांनी रथ सजविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकाडे, उद्योजक चेतन मंडोरे, सुनील अग्रवाल यांच्यासह मान्यवरांनी रथ ओढला. श्री बालाजी रथोत्सवाचे १४२ वे वर्ष आहे. शहरातील गल्ली क्रमांक चारमधील श्री बालाजी मंदिरापासून रथोत्सवाला सुरवात झाली.
पहिल्या आरतीचा मान परंपरेनुसार (कै.) बाबूलाल अग्रवाल यांचे वारसदार कमलनयन अग्रवाल व परिवाराला देण्यात आला. विधिवत पूजेनंतर रथ निघाला. त्यामुळे गल्ली क्रमांक चारला यात्रेचे स्वरूप आले. रथ मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. भाविकांकडून श्री बालाजी भगवानची केळीचा प्रसाद दाखवून आरती केली जात आहे.
रथमार्गावर विविध परिवारांकडून महाप्रसादाचे वाटप केले जात आहे. रथासोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणाई गर्दी करीत आहे. रात्रीपर्यंत मिरवणूक सुरू होती. खोलगल्ली, चर्नी रोड, राजकमल चित्रमंदिर, आग्रा रोडने गांधी पुतळा, गल्ली क्रमांक सहा, अमळनेर स्टॅण्ड, भगवा चौक व गल्ली क्रमांक चारमार्गे श्री बालाजी मंदिरात शुक्रवारी (ता. ७) दुपारी चारला रथ पोहोचेल.
पोलिस अधीक्षकांकडूनही आरती
रथोत्सवात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. पोलिस अधीक्षक पाटील, पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकाडे, पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह रथोत्सवात सहभागी झाले. अधीक्षक पाटील यांच्या हस्ते श्री बालाजी रथोत्सव सुरू होताना विधीवत आरती झाली. भक्तिमय व चैतन्यमयी वातावरणात रात्री उशीरापर्यंत रथयात्रा सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.