15 lakhs substitute with biodiesel seized in Dondaicha dhule crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : दोंडाईचात बायोडिझेलसह 15 लाखांचा ऐवज जप्त; आयजींच्या पथकाचा छापा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) शहरातील धुळे बायपास रोडवर इंडियन ऑइल पेट्रोलपंपाशेजारी जमिनीत खड्डा करून त्यात लपवून ठेवलेले बायोडिझेल पोलिसांनी छापा टाकून पकडले. (15 lakhs substitute with biodiesel seized in Dondaicha dhule crime news)

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांच्या विशेष पथकाने ४ सप्टेंबरला मध्यरात्री केली. यात बायोडिझेलसह विविध साहित्य असा सुमारे १५ लाख ३३ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

डॉ. शेखर-पाटील यांच्या विशेष पथकातील रवींद्र सुरूपसिंग पाडवी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोंडाईचा शहरातील धुळे बायपास रोडवर इंडियन ऑइल पेट्रोलपंपाशेजारी जमिनीत खड्डा करून ट्रक (एमएच २०, डीई ५०८८)मध्ये बायोडिझेलसदृश द्रव भरले जात असतानाच पकडले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याशिवाय लोखंडाची टाकी, प्लॅस्टिकच्या पाइपासह विविध साहित्य असा १५ लाख ३३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला. अंधाराचा फायदा घेऊन दोन संशयित फरारी झाले.

या प्रकरणी बाळू गंगाधर जोशी (रा. डाबरी घरकुल, दोंडाईचा), शेख सलीम मोहम्मद यासीन, शेख अबरार शेख सलीम (दोघे रा. कैसर कॉलनी, शहागंजजवळ, छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह पाच जणांविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात पाच जणांवर ५ सप्टेंबरला सायंकाळी गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT