Dhule News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे धुळे महापालिकेतर्फे शहरात महास्वच्छता अभियान सुरू करण्यात आले.
अभियानांतर्गत गेल्या दोन दिवसांत सुमारे १५ टन कचरा काढण्यात आला. तसेच विविध ठिकाणी साफसफाई करण्यात आली. महापालिकेत महापालिका प्रशासकीय इमारत व परिसर पाण्याने धुऊन काढण्यात आला. (15 tons of garbage removed in Municipal Corporation dhule news)
महास्वच्छता अभियान ८ ते १२ जानेवारीदरम्यान राबविण्यात येत आहे. यासाठी महापालिकेने शहराचे चार झोन पाडले असून, सर्व १९ प्रभागांमध्ये कृती आराखड्यानुसार स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
सोमवारी (ता. ८) शिवतीर्थ चौकात मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर यांच्या हस्ते अभियानाचा प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी प्रभाग १४ मधील शिवतीर्थ चौकात काटेरी झाडेझुडपे तोडण्यात आली.
शहीद अब्दुल हमीद स्मारक अग्निशामक बंबाच्या सहाय्याने पाण्याने स्वच्छ करण्यात आले. तसेच प्रभाग १ मध्ये वलवाडी अमरधाम येथे काटेरी झाडेझुडपे, गवत काढण्यात आले. प्रभाग ७ मधील धर्मवीर आनंद दिघे उद्यान व परिसरात साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते अभियानास प्रारंभ करण्यात आला.
प्रभाग १८ मध्ये गुरुद्वारा परिसरात स्वच्छता करण्यात आली. इतर ठिकाणी दुभाजकांवरील माती, गवत काढण्यात आले. यातून साधारण आठ टन कचरा संकलित करण्यात आला.
अभियानाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. ९) प्रभाग २ मधील नगावबारी ब्रिज परिसर, प्रभाग ६ मधील महिंदळे जलकुंभ परिसर, प्रभाग ८ मधील नवीन मनपा इमारत परिसर, प्रभाग ११ मधील ऐंशी फुटी रोड परिसरात स्वच्छता करण्यात आली.
महापालिका इमारतीत तसेच छतावरही स्वच्छता करण्यात आली. यातून साधारण सहा टन कचरा संकलित करण्यात आला.
या महास्वच्छता मोहिमेसाठी नोडल अधिकारी तथा मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, सहाय्यक नोडल अधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, संदीप मोरे, विकास साळवे, महेंद्र ठाकरे, गजानन चौधरी, प्रमोद चव्हाण, साईनाथ वाघ, सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम परिश्रम घेत आहेत.
बुधवारी (ता. १०) प्रभाग ३ मधील देवपूर बसस्थानक परिसर, प्रभाग १६ मधील संगम चौक परिसर, प्रभाग ९ मधील उमराव नाला परिसर, प्रभाग १९ मधील युनिटी सर्कल, शंभर फुटी रोड भागात अभियान राबविण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.