Heena Gavit and Vijaykumar Gavit esakal
उत्तर महाराष्ट्र

PM Adi Gram Yojana : केंद्राकडून 155 कोटींचा निधी मंजूर; नंदुरबार लोकसभा मतदार संघातील 777 गावांना होणार लाभ

सकाळ वृत्तसेवा

PM Adi Gram Yojana : नंदुरबार लोकसभा मतदार संघात येणाऱ्या ग्रामीण भागातील गाव व पाड्यांमध्ये जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी, युवकांसाठी व्यायाम शाळा, गावांतर्गत रस्ते, गटारी यासह स्थानिक मुलभूत सुविधा उपलब्ध करून देत आदर्श ग्राम विकसित करण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम विकास योजनेंतर्गत नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी १५५ कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. लोकसभा मतदार संघातील ७७७ गावांना या योजनेचा लाभ होणार आहे. (155 crore sanctioned by Centre under Pradhan Mantri Adi Adarsh ​​Gram Vikas Yojana nandurbar news)

नंदुरबार हा आदिवासीबहुल लोकसंख्येचा जिल्हा आहे. येथे जिल्हा निर्मितीस २५ वर्ष उलटले असले, तरी अद्यापही अनेक सुविधा पोचलेल्या नाहीत. राज्य शासनाकडून आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी जिल्ह्यातील जनतेला विविध मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता.

मध्यंतरी ते सत्तेत नसल्याने काहीसा विकास मंदावला होता. मात्र, त्याच काळात खासदार डॉ. हिना गावित यांनी केंद्र शासनाच्या विविध योजना नंदुरबार लोकसभा मतदार संघात खेचून आणल्या. त्यात महिला, युवक, नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगारांसाठी अनेक उपसक्रम व योजना राबविल्या आहेत. मात्र, अजूनही निधी मिळाल्यास काही गावांचा विकास साधता येईल.

नंदुरबार लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील गावांमध्ये विविध मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळविण्यासाठी खासदार डॉ. गावीत व राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. श्री. गावीत यांच्याकडून काही महिन्यांपासून अथक प्रयत्न सुरू होते. मतदार संघातील नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी व नवापुर तालुक्यातील गावांना प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना २०२१-२२ व २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ग्रामविकास आराखड्याच्या निधीस मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या योजनेअंतर्गत नंदुरबार तालुक्यातील ८९ गावे, शहादा- १११, नवापुर- १४५, तळोदा- ७२, अक्कलकुवा- १४२, तसेच अक्राणी तालुक्यातील ११९ अशी एकुण ६७८ गावे व धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील ६० व साक्रीतील ३९ अशी एकुण ९९ गावे मिळून संपूर्ण मतदार संघात एकुण ७७७ गावांना या योजनेमधुन नंदुरबार, तळोदा व धुळे प्रकल्पांतर्गत १५५ कोटी २५ लक्ष ६७ हजार रुपये एवढा निधी मंजुर करण्यात आला आहे.

या सुविधा होतील उपलब्ध

या गावांमध्ये अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण, पेव्हरब्लॉक, बंदिस्त गटार, बसस्टँड, अंगणवाड्या, महिला व पुरुष शौचालय, सार्वजनिक मुतारी, पाण्याची टाकी बांधणे व नळ जोडणी करणे, जिल्हा परिषद वर्गखोल्या, ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह रस्ते व पुलांचे बांधकाम, स्मशानभुमी बांधकाम, आरोग्य उपकेंद्र बांधकाम, संरक्षण भिंत, ग्रंथालय, व्यायामशाळा, आर. ओ. वॉटर फिल्टर, सोलर ड्युअल पंप, सोलर लाईट, हँडपंप अशा विविध विकासकामांना चालना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT