नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत नाशिक विभागातील एक हजार ६३१ भूमिहीन व शेतमजुरांना हक्काच्या जमिनी मिळाल्या आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांत नाशिक विभाग राज्यात आघाडीवर आहे. यातही जळगाव व धुळे जिल्हा आघाडीवर आहे. (1631 landless people got agricultural land in North Maharashtra)
अनुसूचित जाती व नवबौद्धांमधील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजुरांच्या कुटुंबासाठी उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने अशा कुटुंबाच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढून त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा, कुटुंबाचे मजुरीवर असलेले अवलंबित्व कमी होऊन त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना स्वाभिमानाने जगता यावे या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते. राज्यात १ एप्रिल २००८ पासून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजुरांसाठी दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना सुरू झाली.
अशी आहे योजना
योजनेंतर्गत लाभार्थींना चार एकर जिरायती (कोरडवाहू) अथवा दोन एकर बागायती जमिनीचे वाटप करण्यात येते. या योजनेंतर्गत आतापर्यंत नाशिक विभागात (बागाईत २२४१.१३ एकर + जिराईत २२०१.९६ एकर) एकूण ४४४३.०९ एकर जमीन खरेदी करून एक हजार ६३१ लाभार्थ्यांना तिचे वाटप करण्यात आले. या योजनेंतर्गत नाशिक विभागाने खरेदी केलेली सर्व जमीन लाभार्थींना देण्यात आली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांसाठी १५ वर्षे वास्तव्य दाखल्याची अट आहे. भूमिहीन शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांची नावे दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यांना दारिद्र्यरेषेखालचे कार्ड मिळविणे सयुक्तिक ठरणार आहे. त्यांची मिळकत दारिद्र्यरेषेखाली पाहिजे.
जमीन वाटपाची पद्धत
लाभार्थ्यांच्या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. समाजकल्याण संचालक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा भूमिअभिलेख अधिकारी, सहनिबंधक, नोंदणी शुल्क व मूल्यांकन सहाय्यक संचालक (नगररचना) सदस्य असून, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सदस्य सचिव आहेत. जमिनीच्या उपलब्धतेनुसार लाभार्थींची निवड केली जाते. जमीन उपलब्ध झालेल्या गावाच्या परिसरात राहणाऱ्या सर्व दारिद्र्यरेषेखाली भूमिहीन शेतमजूर लाभार्थ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखालील समिती लाभार्थ्यांची निवड होते.
जिल्हा लाभार्थी
नाशिक - २५७
धुळे - ४२४
नंदुरबार - २०७
जळगाव - ४७१
नगर - २७२
(1631 landless people got agricultural land in North Maharashtra)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.