पिंपळनेर (जि. धुळे) : साक्री तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २२.५० कि. मी. अंतराचा व तब्बल सतरा कोटी रूपये खर्चाचा रस्ता मंजूर झाला आहे.
या रस्त्यामुळे (Road) माळमाथा परिसरातील १४ ते १५ गावांना दळणवळणासाठी फायदा होणार आहे. (17 crore road in Sakri Taluka 14 to 15 villages will be benefited dhule news)
सद्यस्थितीत अत्यंत खराब असलेल्या या दुर्लक्षित रस्त्याचे भाग्य उजळणार असून, लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती आमदार मंजुळाताई गावित यांनी प्रसार माध्यमांना दिली.
साक्री विधानसभा मतदार संघातील अष्टाणे, गढबारी, डोमकाणी, वासखेडी, वर्सुस रस्ता (टीआर १४), ग्रामीण मार्ग ३१, इतर जिल्हा मार्ग २० आणि इतर जिल्हा मार्ग ६० या रस्त्यांना जोडणारा अत्यंत खराब व दुर्लक्षीत असलेल्या रस्त्याचे भाग्य उजळणार असल्याचे आमदार सौ. गावित यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक दोन, जिल्हा वार्षीक योजना सर्व साधारण अंतर्गत साक्री तालुक्यातील अष्टाणे ते वर्सुस या २२.५० कि. मी. लांबीच्या रस्त्यासाठी सोळा कोटी ८४ लाख ७९ हजार रुपयांच्या कामास नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यात साक्री तालुक्यासह शिरपूर, शिंदखेडा आणि धुळे तालुक्यातील रस्त्यांचा देखील समावेश आहे.
सर्वात जास्त लांबिचा रस्ता हा साक्री तालुक्यातील आहे. या रस्त्यामुळे माळमाथा परिसरातील मळगांव, दिवळ्यामाळ, कालदरपाडा, डोमकाणी, खुडाणे, निजामपूर, वासखेडी, कैटा, पळीविहीर, कुत्तरमारे, आंबामोर, रुणमळी, वासदरा यांसह इतर लहानमोठ्या गावांना दळणवळणाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
हा रस्ता वर्सुसच्या पुढे चिपलीपाडा, झिरणीपाडा ते राज्य मार्ग क्रमांक ६०ला जोडणारा रस्ता असून, पुढे ब्राह्मणवेल ते छडवेल या मुख्य रस्त्याला जोडला जाईल. रस्त्याच्या कामाची निविदा लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.