Shiv Sena District Chief Adv. Ram Raghuvanshi. Neighbors Deepmala Bhil, Kamlesh Mahale, Kishore Patil, Ramesh Patil etc. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : 17 लाभार्थ्यांना कामाच्या आदेशांचे वितरण; ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मांजरे (ता. नंदुरबार) येथील १५ लाभार्थ्यांना सिंचन विहिरीसाठी ६० लाख, तर दोन लाभार्थ्यांना शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत खडीकरण, मातीकरण करण्यासाठी ४७ लाख याप्रमाणे एक कोटी साडेसात लाख रुपये मंजूर झाले असून, कामांच्या आदेशांचे वाटप शिवसेना (शिंदे गट) ॲड. राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.(17 students Distribution of work orders to beneficiaries nandurbar news)

नंदुरबार पंचायत समितीच्या माध्यमातून योजनेच्या लाभासाठी मांजरे येथील शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले होते. प्रस्तावांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी पाठपुरावा केला. लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करीत गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

आमदार कार्यालयात मंगळवारी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्या हस्ते रवींद्र राऊळ, भगवान पाटील, अनिता पाटील, प्रमिला पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील, दरबारसिंग राऊळ, पोपट पाटील, विनायक पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील, राजेंद्र पाटील, भटा पाटील, दिलीप पाटील, हिरासिंग गिरासे या १५ लाभार्थ्यांना प्रत्येकी सिंचन विहिरीसाठी चार लाखांप्रमाणे ६० लाख, तर गावातीलच दोघा शेतकऱ्यांना शेतापर्यंत खडीकरण व मातीकरण करण्याच्या कामासाठी ४७ लाख ५१ हजार १८५ असे एकूण एक कोटी सात लाख ५१ हजार रुपयांच्या कामांच्या आदेशाचे वाटप करण्यात आले.

पंचायत समिती सभापती दीपमाला भिल, सदस्य कमलेश महाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील, रमेश पाटील, रकासवाड्याचे सरपंच अविनाश भिल, जितेंद्र पवार, माजी पंचायत समिती सदस्य सुनील वसावे, मांजरेचे उपसरपंच समाधान पाटील आदी उपस्थित होते..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT