Gram Panchayat Election : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंचपदासाठी व ५० प्रभागांतून १४० सदस्य निवडून देण्यासाठी, तसेच पोटनिवडणूक दहा ग्रामपंचायतींच्या ११ प्रभागांतून १४ जागांसाठी १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत ऑनलाइन नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ वाढवून देण्यात आली आहे. (19 applications filed for post of Sarpanch in Shahada Taluk nandurbar news)
ऑनलाइन दाखल करण्यात आलेले नामनिर्देशन कार्यालयीन वेळेत तहसील कार्यालयात जमा करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ६१ मतदान केंद्रांवर २५ हजार ८९१ मतदार हक्क बजावणार आहेत.
आजअखेर लोकनियुक्त सरपंचपदासाठी १९, तर सदस्यांसाठी ७७ नामनिर्देशनपत्रे दाखल असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीपक गिरासे यांनी सांगितले.
तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यातील १६ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंच, सदस्य व पोटनिवडणुकीतील उमेदवार निवडून देण्यासाठी दाखल अर्जांची २३ ऑक्टोबरला छाननी, तसेच २५ ऑक्टोबरला माघार व त्याच दिवशी निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी चिन्हासह प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
५ नोव्हेंबरला मतदान, तर ६ नोव्हेंबरला तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असल्याची माहिती शहादा तहसीलदार गिरासे यांनी दिली. सहाय्यक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.