Doctor esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 3 बालकांसह 2 प्रौढांना जीवदान; पावरा ठरले आरोग्यदूत

एल. बी. चौधरी - सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शिरपूरचे आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष व आरोग्यदूत भूपेशभाई पटेल यांनी रुग्णसेवेचाही वसा घेतला आहे.

त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने मतदारसंघातील व बाहेरील शेकडो गरिबांवर विविध महागड्या शस्त्रक्रियांसह उपचार होऊन त्यांना नवजीवन मिळाले आहे.(2 adults including 3 children were saved life by paawar family dhule news )

नुकतेच तीन बालके व दोन प्रौढांना जीवदान देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. शिरपूर (जि. धुळे) येथील अमरिशभाई पटेल व आरोग्यदूत भूपेशभाई पटेल या बंधूंनी शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक व सांस्कृतिक भरीव कामगिरी केली आहे.

आता गरीब जनता विशेषतः आर्थिक स्थिती चांगली नसल्याने उपचार न घेणाऱ्या पीडितांना पदरमोड करून आरोग्यसेवा देऊन दिलासा देण्याचे कार्य ते करीत आहेत. भूपेशभाई पटेल यांची महात्मा फुले जनआरोग्य योजना, विविध सोशल ट्रस्टच्या माध्यमातून अखंड रुग्णसेवा सुरू आहे.

गरजूंच्या मदतीस उपलब्ध

पिळोदा (ता. शिरपूर) येथील हेत्विक कोळी (वय २ महिने) याच्या शुद्ध रक्तवाहिनी व अशुद्ध रक्तवाहिनी एकमेकांना जुळलेल्या होत्या. अत्यंत गुंतागुंतीची व खर्चिक शस्त्रक्रिया करणे हेत्विकच्या मातापित्यांना अशक्य होते.

अशावेळी पटेल बंधू, आमदार पावरा मदतीस धावून आले. रुग्णमित्र दिलीप माळी यांनी कागदपत्रे तयार करून बाळाला दवाखान्यात दाखल करण्यापासून शस्त्रक्रियेपर्यंत सर्व मदत मिळवून दिली. सुमारे तीन लाख रुपये खर्चाची मदत मिळाली.

मातापिता गहिवरले

बाळाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने आई वडिलांना गहिवरून आले. त्यांनी सर्वांचे आभार मानले. शिवाय अशोक बाबुराव पाटील (रा. गरताड, ता. शिरपूर) यांना पुण्यातील रुग्णालयमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ५० हजार रुपये, केमोथेरपी आणि सपोर्ट ट्रीटमेंटसाठी मंजूर करून आणले.

सांगवी (ता. शिरपूर) येथील प्रदीप संजय कोळी (वय १ महिना) याच्या मेंदूमध्ये पाणी झाल्याने डोक्याचा आकार वाढलेला होता. मुंबईत दोनदा शस्त्रक्रिया केली. याकामी पाच लाख रुपये खर्च मिळवून दिले.

विविध संस्थांच्या माध्यमातून दिलासा

वरवाडे (ता. शिरपूर) येथील काशिनाथ दिगंबर माळी (वय ७२ वर्षे) यांना गुडघ्याच्या वाट्या बदलण्यासाठी सहा लाख रुपये मिळवून दिले. टेकवाडे (ता. शिरपूर) येथील दर्शन शशिकांत चित्ते (वय २ महिने) याच्या उजव्या हाताच्या दोन रक्तवाहिनींमध्ये अडथळा असल्याने रक्तपुरवठा सुरळीत होत नाही म्हणून झटके येतात. त्याच्यासाठी एक लाख ६५ हजार रुपये मिळवून दिले. दरम्यान, पटेल बंधूंनी शेकडो रुग्णांवर उपचारासाठी लाखो रुपयांचा निधी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मिळवून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT