bank official giving a check to the heirs of deceased Kisan Pawra. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandubar News : स्टेट बँकतर्फे मृत सभासदाच्या वारसाला 2 लाखांचा धनादेश

तालुक्यातील शिंदवाणी गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील तरुण मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले होते. अशा परिस्थितीत आदिवासी जनजागृती टीम त्यांच्या मदतीला आली.

सकाळ वृत्तसेवा

Nandubar News : तालुक्यातील शिंदवाणी गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील तरुण मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले होते. अशा परिस्थितीत आदिवासी जनजागृती टीम त्यांच्या मदतीला आली.

आदिवासी जनजागृतीच्या पाठपुराव्याने आणि स्टेट बँकेचे अधिकारी वर्गाचे तत्परतेने या कुटुंबीयांना दोन लाखाची आर्थिक मदत मिळाली.

भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ मृताच्या विमा पॉलिसीची कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयात पाठवून २ लाख रुपयांचा धनादेश शाखा व्यवस्थापक डॉ. भूषण जयंत अत्रे यांच्या हस्ते मृत तरुणाचे वडील टिच्या पावरा यांच्याकडे सुपूर्द केला.

शिंदवाणी येथील टिच्या पावरा यांचा मुलगा किसन पावरा यांचा अपघाती मृत्यू झाला होता.

त्यांनी भारतीय स्टेट बँक धडगाव शाखेत बचत खाते उघडून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना घेतली होती.

टिच्या पावरा यांच्या कुटुंबीयांना बँकेचे व्यवस्थापक डॉ. भूषण जयंत अत्रे, बँक कर्मचारी, मनोहर चव्हाण यांनी तत्परता दाखवत अवघ्या काही दिवसांत विमा प्रकरणाला मंजुरी मिळवून दिली.

डॉ. भूषण जयंत अत्रे यांच्या हस्ते ठाकरे यांचे वडील टिच्या सरदार पावरा यांच्याकडे २ लाखाचा धनादेश सुपूर्द केला.

यावेळी आदिवासी जनजागृतीचे सहसंस्थापक अर्जुन पावरा, सदस्य प्रमोद पावरा आणि प्रोजेक्ट मॅनेजर रमेश पाडवी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT