bjp esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar BJP News : भाजपतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर; राजीनाम्याने शहाद्यात खळबळ

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar BJP News : सध्या जिल्हाभरात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडत असतानाच शहादा शहरात मात्र भारतीय जनता पक्षात (BJP) अंतर्गत गटबाजीला उधाण आले असल्याची चर्चा सुरू आहे. (20 loyal office bearers of BJP have collectively submitted their resignations to District President nandurbar news)

पक्षांतर्गत निवडणुकीच्या अनुषंगाने नेत्यांमधील दुफळी उफाळून आलेली असतानाच दुसरीकडे शहर भाजपतील २० निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी सामूहिकपणे जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे भाजपतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून, आगामी निवडणुकांचा हंगाम पाहता भाजपसाठी निष्ठावंतांचे राजीनामे डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हाभरात बाजार समित्यांच्या निवडणुकांचे पडघम सुरू आहेत. त्यात शहादा बाजार समिती निवडणुकीचाही समावेश आहे. शिवाय आगामी काळात पालिका निवडणूक होणार आहे, त्या अनुषंगाने भाजपकडून वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. असे असताना भाजपमधील अंतर्गतच गटबाजी उफाळून आलेली दिसून येत आहे.

कारण बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने शहाद्यात वेगवेगळ्या बैठकांच्या निमित्ताने भाजपतीलच नेत्यांचे गट एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहेत. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नेमकी कोणाची बाजू धरावी या संभ्रमात असतानाच शहर भाजपतील निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सत्ता तिथे कार्यकर्त्यांची मांदियाळी या उक्तीनुसार सध्या राज्यात भाजप सत्तेत आहे. त्यामुळे सहाजिकच कार्यकर्त्यांच्या मोठा गोतावळा पक्षात आहे. जिवाचे रान करून पक्षवाढीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या २० निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी सामूहिकपणे राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द केले आहेत. शहर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे शहराध्यक्षदेखील एकटे पडल्याचे चित्र दिसत आहे.

शहरात गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी रसातळाला गेलेली भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पुन्हा उभी राहिली आहे. आर्थिक बाबीचा विचार न करता या कार्यकर्त्यांनी शहरात पक्षाचे संघटन मजबूत कसे होईल याकडे कटाक्षाने लक्ष देत संपूर्ण शहरात पक्ष पोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

राजकीय परिस्थितीचा सध्याचा विचार करता भाजप देशात व राज्यात प्रबळ असताना आणि पालकमंत्र्यांसह शहरातही हक्काचा आमदार असताना पक्षासाठी जिवाचे रान करणारा निष्ठावंत कार्यकर्ता अधिक मजबूत होणे आवश्यक आहे.

निष्ठावंत कार्यकर्ते उपेक्षित?

पक्षात काम करणाऱ्यांची कमी नाही, पण संधिसाधूंची संख्यादेखील कमी नाही. पूर्वी सत्ता नव्हती त्या वेळी पक्षाकडून किंवा नेत्यांकडून आर्थिक पाठबळ मिळणे शक्य नव्हते. तरीदेखील कार्यकर्ते तनमनाने काम करीत होते. मात्र आता सर्व काही असताना निष्ठावंत कार्यकर्ते उपेक्षित राहत असतील तर कार्यकर्ते मजबूत कसे होतील, असा सूर या राजीनामा प्रकरणाने उमटत आहे.

याबाबतीत वारंवार वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त करीत आपल्या व्यथा पोचविल्या असतानाही त्याकडे झालेले दुर्लक्ष पाहून अखेर शहर भाजपच्या विविध पदांवर काम करणाऱ्या वीस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यात दोन महिला पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT