Dhule Crime News : राज्यात प्रतिबंधित असलेला सुमारे सात लाख रुपये किमतीचा पानमसाला व गुटखा येथील पोलिसांनी पकडला असून, गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
येथील टोलप्लाझावर बुधवारी (ता. ६) दुपारी साडेतीनच्या सुमारास कंटेनर ताब्यात घेण्यात आला असून, एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांपैकी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असून, तो वाहनचालक आहे.(22 lakh worth of goods including container transporting Gutka were seized in songir dhule crime news)
दिल्लीहून धुळ्याकडे येणाऱ्या कंटेनर (एमएच ०४, केयू ५४४८)मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अपायकारक पानमसाला व गुटखा राज्यात विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी टोलनाक्याजवळ सापळा रचला. दुपारी साडेतीनच्या सुमारास कंटेनर आला.
तो थांबवून तपासणी केली असता, त्यात विविध कंपन्यांचा पानमसाला व गुटख्याच्या गोण्या भरलेले ३२ बॉक्स आढळले. सुमारे सहा लाख ६१ हजार ३२० रुपयांचा गुटखा व १५ लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण २१ लाख ६१ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घटनेबाबत अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून, त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होईल. तशी कारवाई सुरू आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी येथील पोलिस ठाण्यास भेट देऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, सहाय्यक उपनिरीक्षक किरण राजपूत, हवलदार संजय देवरे, नरेंद्रसिंग गिरासे, पोलिस नाईक अमरिश सानप, राहुल पाटील, विजयसिंग पाटील यांनी केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.