तळोदा : अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारा २३ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी छापा टाकून शनिवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास शहरातील चार ठिकाणांहून जप्त केला. यात काळा गूळ, नवसागर व इतर साठा असा मुद्देमाल आहे.
दरम्यान, हा सर्व मुद्देमाल एकाच व्यापाऱ्याचा असून, तो व्यापारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. (23 lakh worth of hand furnace liquor seized in raid Excitement by action of Taloda police Nandurbar Crime)
अक्कलकुवा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांना शहरात अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गूळ व नवसागर विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार अक्कलकुवा येथील पोलिस उपनिरीक्षक सागर नांद्रे, हवालदार सतीश वसावे, पोलिस शिपाई रमण वळवी यांना तळोदा येथे जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिले. त्या पथकाने तळोदा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना छापा टाकण्याची माहिती दिली.
तळोदा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार, सागर गाडीलोहार, पोलिस शिपाई अजय कोळी, नीलेश पावरा, भाईदास पावरा, रघुवीर रामोळे अशा अक्कलकुवा व तळोदाच्या पथकाने शनिवारी (ता. ६) सायंकाळी सव्वापाचला शहरातील मुख्य बाजारातील दुकानात छापा टाकला.
त्या दुकानातून ११ हजार रुपये किमतीच्या ११ पांढरा रंगाच्या नवसागराच्या गोण्या, ८० हजार रुपये किमतीचे सुमारे २०० राखाडी रंगाची काळा गुळाची पोती, ३० हजार रुपये किमतीचे जमिनीवर पडलेला काळा गूळ व साखरेचे मिश्रण, २४ हजार रुपये किमतीच्या ८० काळ्या गुळाच्या भेल्या तसेच दुकानाला लागून असलेल्या पत्र्याच्या गोडाउनची पाहणी केली असता त्यामध्ये तीन लाख रुपये किमतीचे सुमारे दीडशे निळ्या रंगाच्या काळा गुळाच्या गोण्या,
तर पंचांसमक्ष पोलिस लाइनसमोरील गोडाउन तपासणी केले असता त्यात ८३ हजार रुपये किमतीच्या एकूण ८३ पांढरा रंगाच्या काळ्या गुळाचा गोण्या व १० लाख रुपये किमतीच्या सुमारे ५०० काळा गुळाचा निळ्या गोण्या आढळल्या.
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शॉपिंगमध्ये तपासणी केली असता आठ लाख रुपये किमतीच्या सुमारे ८०० पांढऱ्या व निळ्या रंगाच्या गोण्या, त्यात काळ्या गुळाची पावडर असा माल मिळून आला. या सर्व ठिकाणाहून एकूण २३ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अक्कलकुवा येथील सचिन पॉल यांच्या फिर्यादीवरून व्यापारी निखिल तुरखिया यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागूल तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.