A field of cannabis in full bloom in Turi's field esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : 3 कोटींचा गांजाचा मळा उद्ध्वस्त; गुन्हे शोध पथकासह सांगवी पोलिसांची संयुक्त कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : लाकड्या हनुमान (ता. शिरपूर) येथील कापूस व तुरीच्या पिकात फुललेला गांजाचा मळा धुळे येथील एलसीबी आणि सांगवी पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आला. जप्त गांजा मोजण्यासाठी पोलिसांना तब्बल दोन दिवस लागले.

या कारवाईत तीन कोटी १० हजार किमतीचा तब्बल ६० क्विंटल गांजा जप्त करण्यात आला.(3 crore ganja farm destroyed by Sangvi Police with Crime Investigation Team dhule crime news )

स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना लाकड्या हनुमान शिवारात गांजाची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांकडून माहितीची खातरजमा केल्यानंतर कारवाईची तयारी केली.

उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सहकाऱ्यांसह सांगवी पोलिस ठाणे गाठून कारवाईबाबत सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांच्याकरवी मदतीची तरतूद केली. एक नोव्हेंबरला एलसीबी आणि सांगवी पोलिसांचे पथक लाकड्या हनुमान येथे रवाना झाले. त्यांनी परिसरात शोध घेत गांजाचे शेत हुडकून काढत तीन कोटीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे, सहायक निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, मयूर पाटील, योगेश जगताप, किशोर पाटील, जगदीश सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, राजू गिते, राजू भिसले, सुनील वसावे, राजू देसले, स्वप्नील बांगर, प्रकाश अहिरे, योगेश मोरे आदींनी ही कारवाई केली.

१ हजार ६८० झाडे

संशयित शेतमालक व गांजाची लागवड करणारा देवा कहारु पावरा (रा. लाकड्या हनुमान) फरार झाला. स्थानिक पोलिस पाटील यांना बोलावून पोलिसांनी शेतमालाच्या नावाची खातरजमा केली. नंतर गांजाच्या शेताकडे पोलिसांनी मोर्चा वळवला. कापूस व तुरीच्या पिकात वाढलेली गांज्याची एक हजार ६८० झाडे आढळली. पोलिसांनी गांजाचा संपूर्ण मळा उद्ध्वस्त करीत झाडे उपटून काढली. त्यांचे एकूण वजन सहा हजार दोन किलो भरले. या मुद्देमालाची किंमत तीन कोटी १० हजार रुपये आहे. हवालदार महेंद्र सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित देवा पावरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पथकाला रिवॉर्ड

गांजा प्रकरणी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्यासह एलसीबीच्या पथकाला वीस हजार रुपयांचा रिवॉर्ड जाहीर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT