Municipal team taking action against TCI company for non-payment of property tax arrears despite appeal. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipality News : थकबाकी न भरल्याने 3 गाळे सील; महापालिका वसुली पथकाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule Municipality News : मालमत्ता कर थकबाकीप्रकरणी महापालिकेच्या कर वसुली पथकाने शुक्रवारी (ता.३) महापालिका हद्दीतील तीन व्यापारी गाळे सील केले. थकबाकीदारांना वारंवार आवाहन करुनही ते थकबाकी भरण्यासाठी प्रतिसाद देत नसल्याने महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे.

शहरात निवासी मालमत्ताधारकांकडे जशी मोठ्या प्रमाणावर कर थकबाकी आहे. ( 3 shop sealed for non payment of dues by municipal corporation dhule news )

तशीच थकबाकी व्यावसायिक मालमत्ताधारकांकडेही आहे. महापालिकेसह इतर खासगी व्यापारी संकुलातील गाळ्यांपोटी महापालिकेकडून मालमत्ता कर वसूल केला जातो. शहरातील अनेक गाळेधारकांकडे मालमत्ता कर थकीत आहे.

अशा थकबाकीदारांना महापालिकेकडून वारंवार थकबाकी भरण्याचे आवाहन केले जाते. मात्र, संबंधित गाळेधारकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अशा थकबाकीदारांवर महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली पथकाकडून अधून-मधून कारवाया पाहायला मिळतात.

शुक्रवारी (ता.३) वसुली पथकाने तीन ठिकाणी कारवाई करून संबंधितांचे गाळे सील केले. यात अवधान येथील टीसीआय कंपनीकडे एकूण तीन लाख ५३ हजार ३१२ रुपये थकबाकी आहे. त्यांनी ती अदा न केल्याने पथकाने कंपनीचे गाळे सील केले.

तसेच शहरातील पाचकंदील भागातील शंकरलाल ब्रिजलाल अगरवाल यांच्याकडे एकूण एक लाख ५४ हजार ६७४ रुपये थकबाकी आहे, त्यांनीही ती न भरल्याने गाळे सील करण्यात आले. तसेच संजय गिंदोडिया (भाडेकरी भाईचंद रायसोनी पतपेढी) यांच्याकडे एक लाख ७४ हजार ५२२ रुपये थकबाकी असल्याने त्यांचेही गाळेपथकाने सील केले.

धुळे महापालिकेचे वसुली अधीक्षक शिरीष जाधव, अधीक्षक मधुकर निकुंभ, निरीक्षक मुकुंद अगरवाल, अनिल सुडके, श्री. वडनेरे, श्रीकांत चव्हाण, सुनील गढरी, गोरख सरगर, संजय शिंदे, अनिल वळवी, याकूब पठाण आदींनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT