crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : दोंडाईचा जिल्हा बँकेत 31 लाखाचा अपहार; शासकीय अनुदानाची परस्पर विल्हेवाट

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : दोंडाईचा येथील धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शासनाकडून आलेल्या नुकसान भरपाई स्वरूपात आलेल्या रकमेत ३१ लाखाचा अपहार झाला असून दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र जयसिंग गिरासे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.(31 lakh embezzlement in district bank dhule crime news)

दोंडाईचा धुळे जिल्हा मध्यवर्ती शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी शिरीष मोतीलाल बाविस्कर यांनी १ एप्रिल २०१८ ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीत नुकसान भरपाई वाटपातील अनियमितता, गैरव्यवहार व अपहार केल्याचे बँकेच्या अंतर्गत चौकशीवर लक्षात आले होते.

त्यानुसार बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने एक समिती गठित करण्यात आली होती. चौकशी समितीने नुकसान भरपाई वाटप न करता ३१ लाख एक हजार १८८ रुपये अंगठा व सह्या करत परस्पर विल्हेवाट लावल्याचे उघड आले.

त्यानंतर बँकेतर्फे संशयित शाखा व्यवस्थापक शिरीष बाविस्कर यांना निलंबित करण्यात येऊन करणे दाखवा नोटीस काढण्यात आली. शाखाधिकारी बाविस्कर यांनी वरील रकमेवर कोणत्याही प्रकारचे समर्पक उत्तर न देता वरील रकमेबाबत मौन बाळगले.

त्यावरून तत्कालीन शाखाधिकारी शिरीष बाविस्कर यांच्या विरोधात १६ मार्च २०२१ रोजी आरोपपत्र दाखल करून चार मुद्यांवर दोषारोप ठेवण्यात येऊन आरोपांबाबत ॲड. संजय भट धुळे यांना चौकशी अधिकारी म्हणून खातेनिहाय चौकशी करून आरोपीस बाजू मांडण्याची संधी देण्यात आली.

चौकशीअंती दोषारोप सिद्ध झालेला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ४ मार्च २०२२ रोजी सादर करण्यात आला. त्यात नुकसान भरपाईच्या रकमेत गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.

तसेच मेथी (ता. शिंदखेडा) येथील सचिव अर्जुन गोरख भील यांचे बचत खात्यात अनेक वेळा रकमा जमा केल्या आहेत. भील हे शिरपूर तालुक्यातील रहिवासी असून त्यांच्या पत्नीच्या नावाने शेती नसताना त्यांच्या बचत खात्यावर नुकसान भरपाईच्या रकमा श्री. बाविस्कर यांनी जमा केल्या आहेत.

अशा प्रकारे तत्कालीन शाखाधिकारी श्री. बाविस्कर यांनी शासनाकडून सभासद लाभार्थ्यांना मंजूर झालेले व शाखेने उघडलेल्या नुकसान भरपाई खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी ३१ लाख सभासदांना अदा न करता त्यांच्या नावाने बनावट सह्या व अंगठे करून रक्कम हडप केली.

अशी केली रकमेची अफरातफर

- सही नमुन्यात खातेदारांची मराठी सही असून रक्कम काढताना अंगठा, इंग्रजी सह्या केल्या आहेत.

- सही नमुन्यात खातेदारांची इंग्रजी सही आहे. मात्र रक्कम काढताना मराठी सही व अंगठा आहे.

- बँकेच्या सही नमुन्यात अनेक सह्यांमध्ये फरक.

- बँकेच्या सही नमुना अंगठा व रक्कम काढताना अंगठ्यात फरक.

- अर्जुन गोरख भील, यांच्या खात्यावर अनेक नुकसान भरपाईच्या रकमा जमा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT