Damru with 37 feet high trishul erected in front of Mahadev temple. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : नगावच्या महादेव मंदिरात 37 फुटांचा त्रिशूळ!

सकाळ वृत्तसेवा

कापडणे (जि. धुळे) : नगाव (ता. धुळे) येथील महादेव मंदिरात (Temple) ३७ फूट उंचीच्या भव्य त्रिशूळासह डमरू उभारण्यात आला. जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा त्रिशूळ आहे. (37 feet trident in Mahadev Temple Nagaon dhule news)

या त्रिशूळाची गावात शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे व माजी सभापती तथा लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती भदाणे यांच्या हस्ते महापूजन करून त्रिशूळाची उभारणी झाली. या वेळी विविध पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला भाविकांची उपस्थिती होती.

शिंदखेडा मतदारसंघाचे माजी आमदार (कै.) द. वा. पाटील यांनी २५ वर्षांपूर्वी दाक्षिणात्य पद्धतीचे भव्यदिव्य महादेव मंदिर उभारले. येथे परिसरासह धुळे शहरातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

मुंबई-आग्रा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकही दर्शनासाठी थांबू लागले. तीर्थयात्रा कंपनीच्या तीर्थाटन पटलावरही या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले. तीर्थयात्रा करणारे भाविक येथे दर्शनासह विसाव्यासाठीही थांबू लागले आहेत.

दरम्यान, नगाव येथे पंचवीस वर्षांपासून महाशिवरात्रीला महादेवाची यात्रा भरते. या यात्रेत तालुक्यासह शहरातील भाविक उत्साहाने सहभागी झाले. माजी आमदार यांच्या पाटील परिवारातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. या महाशिवरात्रीला ३७ फुटी त्रिशूळाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

"महादेव मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. त्रिशूळ उभारणीमुळे धार्मिक आणि भक्तिमय वातावरणाचे धार्मिक सौंदर्य वाढले आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा त्रिशूळ आहे.

-राम भदाणे, जिल्हा परिषद सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Bat: ऑस्ट्रेलियात विराटची क्रेझ! विराटची बॅट खरेदी करायची असेल तर मोजावे लागतील चक्क १ लाख ६५ हजार रुपये

Amravati Assembly Election 2024: दुचाकीवरुन नेल्या ईव्हीएम मशीन; अमरावतीच्या गोपाल नगरमध्ये राडा

Nagpur Crime : धक्कादायक! नागपुरात मतदानानंतर ईव्हीएम घेऊन जाणा-या गाडीची जमावाने केली तोडफोड

Worli Vidhan Sabha Voting: शेवटच्या एका तासात मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढवलं; ठाण्याकडे निघालेला दौरा वरळीकडे वळला...

Vikramgad Assembly constituency Voting : मोखाड्यात मतदान यंत्राची संथ गती, सुर्यमाळ मध्ये रात्री ऊशीरा पर्यंत मतदान 

SCROLL FOR NEXT