Sindkheda Taluka Agriculture Officer Office. esakal
उत्तर महाराष्ट्र

Sakal Exclusive : कृषी विभागात ‘कर्मचाऱ्यांची दुष्काळ’! अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचे 37 पदे रिक्त

विजयसिंग गिरासे

Sakal Exclusive : शिंदखेडा तालुका कृषी कार्यलयात अधिकारी व कर्मचारी अशी एकूण ८४ पदे मंजूर असून, ४७ पदे कार्यरत असून, ३७ पदे रिक्त आहेत.

शासनाच्या कृषी विभागाच्या योजना या तालुका कृषी कार्यलयामार्फत राबविल्या जातात, त्या ठिकाणीच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ‘दुष्काळ’ असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.(37 post of staff including officer vacant in agriculture department in dhule)

शिंदखेडा तालुक्यातील १४३ महसूल गावांतील सुमारे ९९ हजार १५० हेक्टर जमीन लागवडीयोग्य आहे. तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहाय्यक अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, कृषी पर्यवेक्षक ही सर्व पदे कार्यरत आहेत. तालुक्यात शिंदखेडा, चिमठाणे, नरडाणा व दोंडाईचा कृषी मंडळ आहे.

त्यात शिंदखेडा व दोंडाईचा येथील कृषी मंडळ अधिकारी यांच्या जागा रिक्त आहेत, तसेच कृषी सहाय्यकांच्या एकूण ४९ पैकी २५ जागा रिक्त आहेत. कृषी विभागाकडे पी. एम. किसान योजनेचे काम कृषी सहाय्यकांकडे देण्यात आले आहे. प्रत्येक कृषी सहाय्यक तीन-चार गावांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत.

''शिंदखेडा तालुक्यात कृषी विभागात कर्मचारी व अधिकारी यांचे एकूण प्रमाण कमी आहे. इतर तालुक्यांच्या मानाने शिंदखेडा येथे कर्मचारी फारच कमी आहेत. तालुक्यात जवळपास कोणताही अधिकारी काम करायला तयार नाही. याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. शिंदखेड्यात त्यांच्या पाल्यांना शिक्षणाची चांगली सोय नाही. त्यामुळे येथे कर्मचारी यायला नाखूश असतात. जे येथे आले तरी सोय म्हणून इतर शहरात राहतात. त्यामुळे कामावर परिणाम होतो. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या मानाने शिंदखेडा येथे राजकीय पदाधिकाऱ्यांचा जास्त त्रास आहे.'' -ॲड. प्रकाश पाटील, कृषिभूषण, रा. पढावद (ता. शिंदखेडा)

शिंदखेडा तालुखा कृषी कार्यलयातील रिक्त पदे

पदाचे नाव मंजूर पदे कार्यत पदे रिक्त पदे

मंडळ कृषी अधिकारी ४ २ २

लिपिक ४ २ २

कृषी सहाय्यक ४९ २४ २५

अनुरेखक ६ २ ४

वाहनचालक १ ० १

शिपाई ७ ३ ४

एकूण ७१ ३४ ३७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी कायम राहणार का? जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Jammu Kashmir : ...तर काश्मीरमध्ये वेगळी स्थिती असती; उमर अब्दुल्लांकडून वाजपेयींची तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

SCROLL FOR NEXT